वाद्यांची ओळख...💐

ढम ..ढम.. ढम.. ढम... ढोल वाजे , टिम टिम टिमकी
या .. रे.. या.. रे.. मिळून सारे, घेऊ... गिरकी ।
घण .घण..घण..घण घंटा वाजे, वाजे चौघडा ...
भूई वरी बसून सारे ... घालू .. कोंबडा ।
डम .. डम .. डम.. डम... डफरी वाजे ,छुन् ..छुन पैंजण
पद झंकार करा रे .. घालू .. रिंगण।
चिप छ
चिप चिप चिपळी वाजे , टिम टिम संबळ ..
जल्लोषात गाऊ सारे .. घालु .. गोंधळ !
तिरी किटी धा.. तिरी किटी मृदंग वाजे, वाजे तिकडी
हातात हात गुंफुन सारे .. खेळू फुगडी ।
ढिंग टाक् ढिंग टाक् टिमकी वाजे, वाजती चाळ ..
तालात या तल्लीन होऊ,.. खुलवु मन माळ ।
ढण् ढण् ढण ढण मशाल पेटे , करु जागर ...
हासत .. नाचत गाऊ सारे .. करु गजर ।
मोरया ... मोरया... गणपती बाप्पा मोरया ...
मोरया... मोरया... गणपती बाप्पा मोरया !!!
उन्नती गाडगीळ 🙏वा

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme