मनोवंदना
मनोवंदना.. पितरांना...
अनादिकालापासून आपण न पाहिलेल्या देवाचे अस्तित्व मान्य करतो,गणेशोत्सव.. दुर्गोत्सव साजरे करतो.पाण्यासम धन व उर्जा खर्चतो.
वास्तू नेहमी तथास्तु म्हणते.. जिला चालता.. बोलता येत नाही.. भावना नाहीत.. तिला आपण शांतवतो.. पूजतो. .. सजवतो...
याउलट.. अपल्या पूर्वजांच्या अंगाखांद्यावर आपण वाढलेले असतो.. त्यांच्यातील गुण.. आज आपले अलंकार बनून, आपण त्या अलंकारांसह मिरवत असतो.. गाजत असतो.. गाजवत असतो.हे मान्य करावेच लागते..
तर मग.. श्राद्ध.. पक्ष.. करावे का नाही.. श्रद्धा.. अंधश्रद्धा.. वगैरे चर्चा रंगत असतात. कर्म कांड, ज्योतिष शास्त्र, हे टिकेचे विषय ठरतात.
जगात सर्वत्र वर्षातील काही दिवस पितरांच्या साठी राखीव असतात. उदा. Holiwin वगैरे.
तरी आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ.. कर्मकांड करा न करा पण निदान.. आपल्या पूर्वजांनी गाजवलेल्या पराक्रमाच्या गोष्टी.. धडाडी चे प्रसंग, कर्तृत्व.. काही ह्रद्य आठवणी.. त्यांचे प्रसंगावधान काही आदर्श.. पुढच्या पिढीला सांगुया...
त्यांच्यामुळे आज आम्ही असे घडलो .. हे आवर्जून सांगुया..
त्यांच्या स्मरणार्थ दीप लावुया...
काही अन्न दान.. वस्त्र दान.. जल.. धन दान करुया... भारतीय संस्कृतीत किती विचार पूर्व क संस्कार पेरलेत बघा...
प्रथम वंदन गणरायांना...अन् मग.. पितरांना...
आज.. या पंधरवड्यात.. बालकांच्या शांतीसाठी.. सुख सम्रुद्ध साठी पितरांना करुया वंदना..
उन्नती गाडगीळ💐

Comments
Post a Comment