आर्द.. शश्रावण घन
🌾आर्द्र.. श्रावण घन..
1976 .. श्रावण मास.. घरी श्री. सत्यनारायण पूजा करायचे ठरवले.
वेदशास्त्र निपूण जोशी गुरुजींना पूजेसाठी पाचारण केले.
वयोमान बघता.. रिक्षा नेच यावे असे निक्षून.. दोन्ही वेळचे भाडे दिले..
ठरल्या वेळी.. गुरुजी दारात.. पाय धुवून.. कद नेसून.. सूर्या ला अर्घ्य देऊन.. ती तेज:पूंज मुर्ती..
पूजा.. सांगण्यास सिद्ध...
" पूजेची तयारी छान हो "
असे म्हणून..
श्री. गणेशा..आवहन.. पूजन... नवग्रह पूजन.. खणखणीत उच्चार.. श्वासांच्या तालावर.. मंत्रांचे आरोह.. अवरोह..चालू होते.. अचानक लय बिघडली..
वाचताना.. त, न, प, म.. अक्षरात गडबड होऊ लागली.. अं.. काय .. बरं..
हे.. असं.. तर..
गांगरणे.. वेळ मारून नेणे..
सुरू झाले..नेत्रातून धारा..
मी त्यांच्या जवळ गेले..
बघितलं...
हस्ताक्षरातील.. जीर्ण पोथी.. छिन्न.. विच्छिन्न पर्णे.. अक्षरे.. पुसलेली.. मिटलेली..
मी चाटच पडले..
मग.. मी.. हातात पोथी घेऊन पूजा सांगितली...
अक्षरे.. पुसली गेलेली...
माझ्या तरुण वयालाही न उमगणारी...
कथा.. मात्र त्यांनी रंजकतेने खुलवत सांगितल्या.
श्लोक .. भजने.. आरत्या.. सहस्त्र नामावली.. हरिपाठ.. मंंत्रपुष्पांजली..
सारे.. एकापाठोपाठ.. सुस्वरात.. तल्लीन होऊन म्हणले..
मी म्हणाले..'"एवढे सारे का म्हणता? थकून जाल !
पोथी वाचताना चूका होतात.. समाधान होत नाही.. म्हणून जेवढे देवाचे येईल ते म्हणतो.. क्षमा मागतो.
त्यांच्या सच्चे पणाचे कौतुक वाटले. मी ती जिर्ण पोथी घेतली व सांगितले...
" मी लिहून देईन तुम्हाला ही पोथी "
ते म्हणाले..
" पोरी.. इतके सोपे नाही.. त्यातून तुझे तान्हुलं.. तुझा अभ्यास.. आत्ता सुद्धा मधे.. मधे.. ते तान्हुलं कितीदा रडलं.. "
मी पोथी ठेवून घेतली..
झेरॉक्स.. त्याकाळी नव्हते. मराठी .. संस्कृत.. टायपिंग.. अवघड च ..
दोन रात्री.. 1ते 3बसून अक्षरे लावून.. मी पोथी उतरवून काढली..
अक्षर.. टपोरे.. मोठे काढणे.. संस्कृत.. पंक्ती जशाच्या तशा लिहीणे..
मराठी अर्थ..
सारे सारे.. क्लिष्ट.. त्यात मधे.. मधे.. माझी सोनुली.. तिची सनई.. ताशे.. सारे च..
पण.. ते हस्तलिखित त्या गुरुजींना दिले..नमस्कार केला.. माझ्या पाठीवर थरथरते हात.. पाझरते नेत्र..
अन् आर्द्र श्रावण घन ओथंबून म्हणाला..
"पोरी, माझे म्हाताऱ्याचे आशीर्वाद.. हस्ताक्षर दान केलेस तू.. सतत सुखाची.. सम्रुद्धीची बरसात होईल.. देव व दैव पाठी राहील "
तात्पर्य काय की परिस्थिती नुसार मनस्थिती बदलते.. वर्तन ठरते..
आपण.. तो लबाड, फसवा, अशी लेबलं लावतो..
मानवाच्या अंतरात एक आर्द्र घन.. असतोच.. त्याला शोधण्याचा प्रयत्न करुया..
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments
Post a Comment