पोतराज...
🍁 पोतराज...
पुरुष असुनही भरपूर केसांचा अंबाडा.. भाळी हळदी कुंकू चा मळवट.. घोळदार घागरा..त्याला बांधलेले खण.. कमरेला.. घुंगरु माळ..पायात मोठे जाड वाळे..भरदार मिश्या..गळ्यात कवड्याची माळ..हातात.. कोरडा..
एक स्त्री.. मरीआई चा देव्हारा डोईवर घेऊन. ..हाती मोरपिसाचा कुंचा घेऊन...
साथीदाराच्या सुंद्री व डफरीच्या तालावर बेभान.. नाचत राहते..
पोतराज दंडाला दोरी करकचून बांधून... डोळे वटारत.. हातातील कोरडा हवेत फिरवत स्वतः च्या च पाठीवर फटाफट आवाज काढत नाचत होता..
.... दार उघड बये दार उघड...
.... मरी आई दार उघड...
.... लक्ष्मी आई दार उघड... सुटला.. वारा..
.... पडती .. धारा...
आवर... पसारा ।
त्याच्या प्रत्येक फटकाऱ्या बरोबर ती स्त्री.. प्रश्न विचारते...
आई.. सुगी होईल का ?
... पाऊस पडलं का?
... रोग राई टळलं का ?
डफ वाजतच राहतो...
... ***
तो पोतराज आपला प्रतिनिधी...
प्रत्येक मना मनात एक पोतराज दडला आहे...
मनावर प्रश्न रुपी कोरडे मारूया...
श्री. समोर.. आज..
असमाधान..
अस्वच्छता..
अश्लीलता..
स्वैराचार..
भ्रष्टाचार..
व्याभिचार..
प्रदूषण...
कुपोषण..
..इ. अनेक आपल्या अंतरात वसलेल्या व्रुतींचे एकेक फटकारा मारून विसर्जन करूया...
" तुष्टर्थं पुष्ट्यर्थं सर्वारिष्टं शांतर्थंम । "
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments
Post a Comment