पाहुणा ...

🌺 पाहुणा...
दहा दिवसांचा हा पाहुणा..
दशदिशा उजळुनी गेला..
अनेक विद्या.. कला गुणांना फुलवून.. मंत्रांचा वर्षाव करून..तंत्राला नमवून..यंत्राला चालना देऊन.. चराचरात चैतन्य निर्माण करून... मंत्रमुग्ध करुन..श्रेय.. प्रेय.. मधुर.. कटू.. सारे अंगिकारुन .. हासत..हासत.. भरभरून आशीर्वाद देत.. मनाला हुरहूर लावून विसर्जित झाला...

पाहुणा कसा असावा  व कसा नसावा याचा वस्तू पाठ देऊन गेला...

ज्याची जशी स्थिती.. परिस्थिती.. मनस्थिती असेल त्याच्याशी जुळवून घ्यावे... हा महत्त्वाचा संदेश देऊनी गेला...

पाहुणे म्हणून जावे, त्यालाच निंदावे..त्याच्यावरच स्वामित्व गाजवावे..
त्याच्याविषयी दुसऱ्याचे कान भरावे..
त्यामुळे त्याचे जीवन उद्ध्वस्त करावे..ऐसें न वागावे..
पाहुण्याने शिरजोरीने त्या घराची.. नात्याची मोडतोड न करता.. तडजोड करावी... त्या घरातील व्यक्तीला मान द्यावा.. मान घ्यावा.. हा खूप मोठा धडा.. जो .. वयोज्येष्ठ, ज्ञानश्रेष्ठांना सुद्धां अवगत नाही.. तो .. मनोसंयम.. शिकवणाऱ्या गौरीनंदनास शतशः नमन ।
***
***उतार वयात प्रत्येकावर वेळ येते.. पाहुणे.. बनून राहण्याची***
तेव्हा..
घेऊया , निमूट वर्तन शास्त्राचा धडा...
भरुया , मन:शांतीचा घडा ।
उन्नती गाडगीळ 🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme