मातृभोजन..💐
👏मातृभोजन..👏
बटू चे मातृभोजन,काय वर्णावा थाट,
चांदीचे ताट, अन् चंदनाचा पाट ।
कमलवेलींची रेखली..रांगोळी...
सभोवती सजल्या.. लेकुरवाळी।
अष्टवर्ग्याचा आज मान..खास..खास..
चंदन,केवड्याचा दरवळे.. सूवास।
चंदेरी वाटीत शोभती पाच खीरी..
साजूक तूपाची धार..साखर भातावरी।
फेणी, जिलेबी, श्रीखंड पुरी,करंजी अन् बासुंदी..
घीवर,चिरोटे, खवा पोळी,आणि नाजूक बुंदी।
दोन्ही आज्या.. मायेने भरवती..बाळा..
सोडून दे बाळा.. आता तू..वेडा चाळा।
आत्या, मावशी, काकू,मामी..देतील गोड घास..
सातत्याने धरी.. बाळा..विद्येची कास।
नाचत..मुरडत करवली येई..ठेक्यात...
अमृताचा घास भरवी.. भावाच्या मुखात।
जरतारी पैठणी लेवुनी, सज्ज माता मीना..
सुवर्ण घास..पुत्रा.. भरवुनी.. अर्थ देई जीवना।
पुढील जीवनी सेवन कर.. सर्वज्ञानाचे घास..
सार्थ होईल जीवन.. यश,किर्ती लाभो..खास..खास।
बटू चे मातृभोजन.. काय वर्णावा थाट..
आशीषसुमनांनी.. उजळो.. जीवन वाट।।
उन्नती गाडगीळ🙅
बटू चे मातृभोजन,काय वर्णावा थाट,
चांदीचे ताट, अन् चंदनाचा पाट ।
कमलवेलींची रेखली..रांगोळी...
सभोवती सजल्या.. लेकुरवाळी।
अष्टवर्ग्याचा आज मान..खास..खास..
चंदन,केवड्याचा दरवळे.. सूवास।
चंदेरी वाटीत शोभती पाच खीरी..
साजूक तूपाची धार..साखर भातावरी।
फेणी, जिलेबी, श्रीखंड पुरी,करंजी अन् बासुंदी..
घीवर,चिरोटे, खवा पोळी,आणि नाजूक बुंदी।
दोन्ही आज्या.. मायेने भरवती..बाळा..
सोडून दे बाळा.. आता तू..वेडा चाळा।
आत्या, मावशी, काकू,मामी..देतील गोड घास..
सातत्याने धरी.. बाळा..विद्येची कास।
नाचत..मुरडत करवली येई..ठेक्यात...
अमृताचा घास भरवी.. भावाच्या मुखात।
जरतारी पैठणी लेवुनी, सज्ज माता मीना..
सुवर्ण घास..पुत्रा.. भरवुनी.. अर्थ देई जीवना।
पुढील जीवनी सेवन कर.. सर्वज्ञानाचे घास..
सार्थ होईल जीवन.. यश,किर्ती लाभो..खास..खास।
बटू चे मातृभोजन.. काय वर्णावा थाट..
आशीषसुमनांनी.. उजळो.. जीवन वाट।।
उन्नती गाडगीळ🙅
Comments
Post a Comment