पैसा झाला मोठा..💐

⭐पैसा झाला मोठा...

खूप वर्षांपूर्वी एक गोष्ट वाचली...

कै. लाल बहादूर शास्त्री यांच्या कुटुंबातील एका सदस्यांनी एका बागेत झाडावरून खाली पडलेले दोन आंबे घरी आणले. ते बघताच लाल बहादूर शास्त्री संतापाने लाल झाले...त्यांच्या मते..
आंबे पडलेले असले तरीही त्यावर हक्क.. त्या बागेच्या मालकाचाच!!!

त्या मालकाच्या परवानगी विना घेणे.. एक प्रकारे चोरी च !!! ते अंबे परत करायला लावले !!!
याला म्हणतात न्याय!!!

त्याप्रमाणेच.. शिवाजी, शास्त्री, टिळक,इ. प्रभुतींचे न्याय दान प्रसिद्ध आहे.

न्यायालयाविना सुद्धा सच्चा न्याय देण्याची व्रुत्ती एक आदर्श निर्माण करते..

पण.. आता.. प्रगतीपथावर..

बेफाम वाहने चालवून अजाण जीवांचा चक्काचूर करणे...

बेछूट पणे बंदुकीच्या फैरी झाडणे..

अन् बिनदिक्कतपणे ⭐म्हणून वावरणे...

याला काय म्हणावे?
जामिनावर  सुटणे.. म्हणजे निर्दोष ठरतो का?
सिनेसृष्टीतील स्वतःला ⭐समजणारे.. त्याला हार तुरे घालून स्वागत करतात?

पेढे वाटतात?जल्लोष करतात?आनंदाने नाचतात?
जरा ही नाही वाटत नाचक्की ?.. नाही खंत?
नाही खेद?

अख्ख्या सिनेजगताला..
खुपायला हवा *सल*
खाली जायला हवी *मान*!!!
*इतका पैसा मोठा झाला?*
उन्नती गाडगीळ 🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme