त्याला .. ही वळण लावुया...💐

👭 ' त्याला ' ही हे वळण लावुया..

घरातील मुलगी वयात आली की आपण  तिचे कौतुक तर करतोच पण.. डोळ्यात तेल घालून जपतो..जागता पहारा ठेवतो..

पण.. मुलगा वयात आला की मात्र ..
आपण फक्त त्याचे शिक्षण, करिअर, इ.बाबतीत लेक्चर्स देत रहातो. पण..

नैतिक संस्कार या बाबतीत विशेष लक्ष घालत नाही.

मुलगा.. कुठे जातो..भटकंती, वाहनांचा वेग, मित्र,व्यसने, पैसे वापर, बेहिशेबी वर्तन,
अन् महत्त्वाचे म्हणजे..

त्याची  मुलींशी मोकळीक...जवळीक...

या बाबतीत मित्र बनून त्याच्याशी संवाद साधणे आवश्यक आहे.

त्याला सांगावे..
तू उद्याचा .. पिता... आहेस. समाजात तुला प्रतिष्ठित स्थान.. मान.. मिळवायचा आहे. त्यासाठी.. तुला तुझे तन.. मन पवित्र ठेवणे आवश्यक.हे संस्कार जरुरी.

एक पुरुष.. भ्रमर.. अनेक स्त्रीयांचा.. फुलांसम सहज चोळामोळा करतो..असुरी आनंद मिळवतो.पण त्याला हे समजत नाही की तो आनंद क्षणिक असतो.

तो अनेक रोगांची शिकार बनतो! मनाने कमकुवत,भ्याड,लाचार, बनतो.समाज नजरेतून उतरतो.भ्रष्ट एकाकी जीवन जगतो !मुख्य म्हणजे.. बहुस्पर्शी वर्तनाने.. त्याच्या मुलांना  अनेक व्याधी जडतात!!!

हे सारे मुलांना समजावून सांगणे.. ही काळाची गरज आहे.

प्रत्येक पालकाने आपल्या मुलाला.. ' तन -मन संयमन व संरक्षण' हे धडे बाल्यापासूनच दिले तर..

रोज.. रोज.. कानावर पडणाऱ्या .. अत्याचार व बलात्काराच्या बातम्या नक्कीच कमी होतील.

हे धडे... मुलगा व मुलगी दोघांना देऊया...
 नव शिशुंना रोगमुक्त करुया..
उन्नती गाडगीळ 🌹🙏

एक

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme