प्रसन्न पहाट..💐
🍀 प्रसन्न पहाट...चिमण्यांचा चिवचिवाट...लुकलुकते चिमण डोळे वाट बघत होते...मी रोजच्या प्रमाणे एका वाटीत तांदुळ व एकात पाणी भरुन त्यांच्या समोर ठेवले...
अन् सुई दोरा घेऊन बसले...
हासरी ...गोजिरी प्राजक्ताची परडी बघून मम मनाची दुरडी आनंदे भरली...
सर सर शुभ्र फुले माळताना...निर्जीव दोरा सुद्धा रंगीत होत होता !!!
काही नासकी...कुजकी...तुटकी...फुले वगळून मी हार गुंफले....
असच असत का जीवन ? जीवन मालिका साकारताना... काही आप्त... सुप्त तेने ...पाय ओढतात...बदनामी करतात... जळफळाटाने..तळतळाट देतात... स्वत:ची टिमकी मिरवताना...दुस-यास बदनाम करतात..चिखलफेक करतात...
नवीन वर्षी ...नासकी ..कुजकी...फूलें ( व्यक्ति )
वगळून...जीवन माला... शुद्ध ...सुंदर ...प्रदूषण विरहीत ..बनवुया ...
चिमण्या... उलट्या सुलट्या गिरकत..ठुमकत... तुरतुरत...फडफडत...डोळे मिचकावत ... चिवचिवत.. मातीत सांडलेले दाणे टिपत होत्या..जराही माती...खडेर...कचरा..न लागु देता...
नीर क्षीर विवेकी वृत्ति ..कशी धरावी... अचूक काय ..कसे टिपावे...ते सांगत होत्या...हासत खेळत...पाठ...देत होत्या ...
उन्नती गाडगीळ 🌷 🙏

Comments
Post a Comment