कैरी ही..💐
कैरी ही कोकणातली ...
भलतीच बाई ... नखरेल ।
वसंताने हिरवी साड़ी नेसवली ...
भरारा .. सोडून .. केशर ल्यायली ।
जेंव्हा करकरीत कच्ची , गुमानं दगड खाते,
आता रसरशीत पक्व , गुर्मित ' भाव ' खाते ।
तेंव्हा निमुट बसायची भर बाजारात .....
आता न्हाते गंधात ... बसते विमानात ।
ही बाई वाढवते ... देशाची ' शान ' ...
परदेशात उंच .... कोकणची मान !
ओलेत्या नेत्राने देऊया तिला .. निरोप ....
हासत खेळत रुजवुया नवे ... रोप !!!
उन्नती गाडगीळ 🙏
भलतीच बाई ... नखरेल ।
वसंताने हिरवी साड़ी नेसवली ...
भरारा .. सोडून .. केशर ल्यायली ।
जेंव्हा करकरीत कच्ची , गुमानं दगड खाते,
आता रसरशीत पक्व , गुर्मित ' भाव ' खाते ।
तेंव्हा निमुट बसायची भर बाजारात .....
आता न्हाते गंधात ... बसते विमानात ।
ही बाई वाढवते ... देशाची ' शान ' ...
परदेशात उंच .... कोकणची मान !
ओलेत्या नेत्राने देऊया तिला .. निरोप ....
हासत खेळत रुजवुया नवे ... रोप !!!
उन्नती गाडगीळ 🙏
Comments
Post a Comment