पटापट.. पण..रुचकर..💐
🌺काल आमच्याकडे ह्यांचे एक मित्र फराळाला आले होते..
त्यांना दुधाचे पदार्थ वर्ज्य...मग.. सहज सोपा खालील पदार्थ केला. त्यांना तर खूपच आवडला. ते घरी गेल्यावर त्यांच्या पत्नी ने फोनवरून पाककृती विचारली..
--- -- -- *रस भगर* --- --
साहित्य..1वाटी वऱ्याचे तांदूळ (10..15मिनिटे आधी धुवून निथळत ठेवले) 1च. साजूक तूप, चार..पाच ग्लास ऊसाचा ताजा रस, किंचीत गुळ, लिंबू रस,नारळ चव, लवंग, दालचिनी,वेलची पूड,केशर, बदाम,पिस्ता, बेदाणे, वगैरे.
क्रुती.. तुपावर लवंग व वऱ्याचे तांदूळ भाजून घेणे,त्यात नारळचव, ऊसाचा रस.. हवा असेल तसा तसा व सर्व साहित्य घालून.. ढवळून.. वाफा आणाव्यात..
शिजल्यावर.. वरुन किंचीत तूप सोडावे..
पातळसर/घट्ट जशी हवी तशी भगर करावी.
वयोवृद्धांना.. ऊसाचा रस जास्त प्रमाणात घालून पातळसर छानच!!!
काल खूप वर्षानी वरील पदार्थ केला.. अन् आईची आठवण झाली..
तिच्या साठी मी .. तांदूळ मिक्सरमधून काढून.. तो रवा .. तुपावर परतून.. कधी ऊसाचा रस तर कधी आंब्याचा रस.. दूध घालून पातळसर पायसम् करत असे.. ती पण आवडीने सेवन करत असे.
उन्नती गाडगीळ 🙏🌹

Comments
Post a Comment