मुहूर्त गान.. विवाह/मुंज..💐
मुहूर्त गान...(विवाह/मुंज)
श्री. गणेशा आवाहन, मस्तक लवून,
कुलस्वामिनीला विनवू,मनोभावे वंदून।
अत्तराचा घाला सडा,चंदनाचा लावा टिळा..
माऊलीला हिरवा चूडा,काळी पोत माळा गळा।
उपनयन सोहळा, बटूचा आगळा..
मुहूर्ताची झाली वेळा,वसंत आला..आला।।
पाच घरच्या सुवासिनी, आल्या नटुनी,थटुनी..
द्विकुली आनंद.. वाहे दुथडी भरुनी।
पीत वर्ण सोनसळा,जर्द हळदीचा पिवळा..
पहिला मान उखळा.. उधळे सोनसळा।
लाल शालू नेसुनी बसली,मिरचीबाई माझी रुसली..
दुसरा मान देऊया तिला.. लाल लाल रंग उधळी।
पांच खिरी कराया, आल्या ग माहेरवाशिणी..
टकटक जोडवी.. वाजती ग अंगणी।
लाडू गोल वळाया,सजल्या कुवारणी...
औक्षणा सज्ज.. माता..मीनाराणी।
मुसळाला कुंकू लावा,फोडुया सुपारी..
अंगतपंगत करुया.. भरदूपारी।
चटपटीत मुगवड्या,करा..झरा झरा..
आजी..आजाच्या डोळा.. आनंद धारा।
उन्नती गाडगीळ 💐
श्री. गणेशा आवाहन, मस्तक लवून,
कुलस्वामिनीला विनवू,मनोभावे वंदून।
अत्तराचा घाला सडा,चंदनाचा लावा टिळा..
माऊलीला हिरवा चूडा,काळी पोत माळा गळा।
उपनयन सोहळा, बटूचा आगळा..
मुहूर्ताची झाली वेळा,वसंत आला..आला।।
पाच घरच्या सुवासिनी, आल्या नटुनी,थटुनी..
द्विकुली आनंद.. वाहे दुथडी भरुनी।
पीत वर्ण सोनसळा,जर्द हळदीचा पिवळा..
पहिला मान उखळा.. उधळे सोनसळा।
लाल शालू नेसुनी बसली,मिरचीबाई माझी रुसली..
दुसरा मान देऊया तिला.. लाल लाल रंग उधळी।
पांच खिरी कराया, आल्या ग माहेरवाशिणी..
टकटक जोडवी.. वाजती ग अंगणी।
लाडू गोल वळाया,सजल्या कुवारणी...
औक्षणा सज्ज.. माता..मीनाराणी।
मुसळाला कुंकू लावा,फोडुया सुपारी..
अंगतपंगत करुया.. भरदूपारी।
चटपटीत मुगवड्या,करा..झरा झरा..
आजी..आजाच्या डोळा.. आनंद धारा।
उन्नती गाडगीळ 💐
Comments
Post a Comment