भोंडला..
भोंडला
उन्नती गाड्गीळ
भोंडला हिरव्यागार धरेला उसळत्या सागराला उंच उंच पर्वत राशींना चिडवत- चिडवत, उंच भरारी घेणाऱ्या पक्ष्यांना खिजवत, आमचे विमान ३०००० फुटांपेक्षाही जास्त उंचीवर भ्रमण करत होते. काही वेळातच पाऊस सुरु झाला. नाजूक रेशीम धारांचे एक पटल तयार झाले. त्या पारदर्शक पटलात घुसून त्याला पार करून तेजस्वी सूर्यकिरण काळ्या मेघांवर आपटत होते. झुळझुळ वारा, रेशीम धारा, उजळती रश्मी आणि सावळे मेघ हातात हात घालून रिंगण घेत होते त्यातून एक सुंदर सप्तरंगी पूर्ण गोलाकार इंद्रधनुष्य तयार झाले होते. धरतीवरून ते आपणास अर्धेच दिसते. पण अति उंचीवर विमानातून हे अदभूत पूर्णाकृती इंद्रधनुष्य दिसते ते मी नजरेत टिपत होते. हे रंगीत गोलाकार चक्र बघून मला आठवला पृथ्वीवरील भोंडला.
माझे मन बालपणात गेले.
हस्त नक्षत्रात काळे ढग अजस्त्र भासतात, जोरात गरजतात, विजा कडकडत, जल धारा कोसळतात म्हणून यास हत्तीचा पाऊस म्हणतात. हत्ती हा शक्ती व समृद्धी दाता आहे. साक्षात गजानन! म्हणून त्याची पूजा करतात! अश्विन शुद्ध प्रतिपदा ते दसरा, दहा दिवस भोंडला रूपाने या गजाननाची पूजन करायचे. पूर्वी चौसोपी वाडा, मोठी अंगणे होती. अंगणात शेणाचा सडा घालत त्यावर मध्यभागी सुबक हत्ती रेखाटत. त्या हत्तीची पूजा करत.
पुढील आयुष्याचा खेळ सुखद होवो ही प्रार्थना बाल मुखातून करत असत. त्या हत्ती भोवती गोल करून आम्ही सर्व सख्या हातात हात घालून भोंडला करायचो. रंगी बेरंगी कपडे घालून, हातात बांगड्या, पायात तोरड्या, गळ्यात - कानात - हातात खास तुलसी बागेतील असली दिसणारे पण नकली दागिने मिरवत, परकर सावरत, गोल गोल फिरत. अनेक बालिकांनी एका सुरात गायलेले समूह गान - म्हणजे भोंडला ! आवाजाची स्पर्धा नाही, वाद्य वृंदाची गरज नाही. ढंगाचे ढोलके, वा-याची सनई, पानांची सळसळ, याचाच सुंदर ताल साथीला. रोज चढते गाणे व रोज वाढती खिरापत अशी मज्जा असे. खिरापत - चुरमुर्या पासून ते श्री बालाजीची सासू पर्यंत कोणतीही असे पैशाची उधळण नाही. देखावा नाही. केळीच्या कर्दळ च्या पानावर खिरापत दिली जाई. नंतर ती पाने गोठ्यातील गाईला!
कचरा, ध्वनी कसलेच प्रदूषण नाही. कधी कधी तर पसा पसा भरून खिरापत वाटली जाई! इगो नाही, रुसवे-फुगवे नाही, भेद भाव नाही भोंडला म्हणजे दुखाचे संकटाचे विसर्जन ! आनंद उर्जेचे वर्धन ! रस रंग गंध यांचे संमेलन. भोंडला, गरबा, रास भांगडा असे कोणतेही मंडलाकार नृत्य असो, रस - रंग - गंध यांची जाणीव करून देणा-या कलांची, निर्मिती करणा-या निसर्ग गुरूला मनोमन अभिवादन करूया !
सर्व प्रथम निसर्ग पूजन करून निसर्गाचे संवर्धन करूया पृथ्वी ला वाचवुया !
उन्नती गाडगीळ💐

Comments
Post a Comment