खास खास घट..💐
🌸खास..खास घट..
पूर्वी *आम* असलेला post man नामक घट ,आम्हा सामान्य माणसासाठी मात्र . *खास खास* होता.
मी लग्नानंतर प्रथमच आईला सोडून दूर अहमदाबादला गेले...
तेव्हा.. आई नामक वत्सल घट व मी यांना जोडणारा खास खास दुवा.. पोस्ट मन!
आईच्या पत्राची वाट बघताना, आधी पोस्टमनच्या वाटेकडे डोळे लावून बसणे..हा एक छंद जडला...
लांबून पोस्टमन येताना दिसला..की हातातील कामे सोडून, धावतच गेट पाशी जाणे.. टपकन् पत्र टाकले की पटकन उचलून घेणे..अक्षरावरून आईचे पत्र ओळखले की..टर्रकन फोडून भर्रकन एका नजरेत आधाशीपणे वाचणे, मग परत.. परत.. सावकाशीने पारायणे करणे.
आईचे पत्र म्हणजे एक निबंध... सुंदर रेशीम धारा... वाचताना सुद्धा एखादा मोती टपकन् पत्रावर पडला की भानावर येणे.
सर्व.. सर्व.. गोष्टी... सविस्तर वर्णन, कधी कधी मनोगत.. खुशाली.. अगदी शेजारी, पाजारी, माझ्या बागेची सुद्धा आवर्जून चौकशी असे...
आईच्या पत्रातून.. अनेक मैलांचे अंतर ह्रदयापर्यंत आणणारा पोस्टमन नामक संदेश वाहक जणू देवदूत भासे.
हळूहळू या देवदुताशी माझे मैत्र झाले...
कडक उन्हाळ्यात, धुवाधार पावसाळ्यात, कडाक्याच्या थंडीत सुद्धा घरोघरी हजेरी लावणारा,हा पोस्टमन... नामक दुर्लक्षित व काहीसा उपेक्षित घटक.. तुटपुंज्या पगारात, तुटक्या घरट्यात, काडी काडी जोडून संसार करत होता.
माझे वय वाढत गेले.. त्यासह जाणीवा धारदार झाल्या.विचार क्षमता निर्माण झाली. मग मी त्याच्या दोन्ही मुलांची मोफत शिकवणी घेऊ लागले.
आता तर दिवस पालटले.पोस्टमन .. च्या कष्टांची दखल सरकारने घेतली. हा संदेश वाहक.. *खास खास* बनला.
शारीरिक कष्ट कमी झाले. वाहन मिळाले.पत्रपेट्या.. एका स्थानी आल्या. जीने चढउतार वाचली.
आता हा घट दुर्मीळ झाला. खराखुरा *खास* बनला.
पण.. माझ्या मातृघटाशी मला सांधणारा.. तो एक सेतु होय.
समस्त डाक कर्मचाऱ्यांना मनोभावे वंदन!!!
उन्नती गाडगीळ.🌹🙏

Comments
Post a Comment