सांज..💐
🌼 सांज ...
सांज सोनेरी उधळत येई अबीर ...
तिज बिलगाया .. चंचल वारे अधीर ।
तेज बाळ निमुट धरी क्षितिज कर ...
पश्चिम माया अतूट , पसरे पदर ।
निल जळ ऊसळे , अर्घ्य देई सागर ..
कृतार्थ वंदन .. आद्य देवा.. दिनकर ।
गाभुळले नभ .. पक्षी परते कोटरा ...
हरखले मन , हरित रानी चौखुरा ।
इंद्रधनु माळा .. जाती लगबग घरा ...
गूज फुलवी मळा .. जीवन सुस्वरा ।
उन्नती गाडगीळ 🙏
सांज सोनेरी उधळत येई अबीर ...
तिज बिलगाया .. चंचल वारे अधीर ।
तेज बाळ निमुट धरी क्षितिज कर ...
पश्चिम माया अतूट , पसरे पदर ।
निल जळ ऊसळे , अर्घ्य देई सागर ..
कृतार्थ वंदन .. आद्य देवा.. दिनकर ।
गाभुळले नभ .. पक्षी परते कोटरा ...
हरखले मन , हरित रानी चौखुरा ।
इंद्रधनु माळा .. जाती लगबग घरा ...
गूज फुलवी मळा .. जीवन सुस्वरा ।
उन्नती गाडगीळ 🙏
Comments
Post a Comment