ज्येष्ठ वृक्ष..💐
☂ज्येष्ठ वृक्ष..
*जुन्या प्रत्येक झाडाला पुन्हा बिलगायचे आहे*
1)बहिष्काररुपी चिखलातून ज्ञानेश्वरी कमल कसे फुलले ,ज्ञानवृक्षाला विचारायचे आहे..
2) कोळूला जुंपूनही रक्ताची शाई कशी केली?
हे स्वातंत्र्य वृक्षाकडून शिकायचे आहे.
3) "स्वातंत्र्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे"
हे जुलमी सत्तेला ठामपणे सांगणाऱ्या बीजाला ..धैर्याचे गमक विचारायचे आहे..
4) निर्माल्यातुनी फुले कशी काय निर्मिली?
हे बाबा आमटे नामक दयाळु वृक्षाकडून जाणणार आहे.
5) स्त्री.. शिक्षणासाठी स्वत्वाची ज्योती सतत तेवत ठेवणाऱ्या ज्योतिबा नामक तेजो वृक्षाला कृतज्ञता पुष्प अर्पण करायचे आहे..त्यासाठी..
*जुन्या प्रत्येक झाडाला पुन्हा बिलगायचे आहे...
त्यांच्या विचारांचे खत मम मुळांना द्यायचे आहे.*
पूर्वी च्या काळी पैशांची चणचण, साधनांची कणकण,नित्य वणवण,सभोवताली भुणभुण, कुरबुर,विरोध, अंधश्रद्धा, आळस असुनही ..
अनेक ज्येष्ठ कर्तृत्व श्रेष्ठ ठरले..वटवृक्ष, झाले.त्या वटवृक्षांना आज वंदन!!!
आता विज्ञान युगात --
मात्र काही वयाने ज्येष्ठ असले,तरी वाढत्या वेगाबरोबर लालसा,चंगळवादी वृत्ती वर्धित होते आहे.त्यातून काही वयोजेष्ठ ..कुरकुर,भुणभुण, असंतोष, हटवादी बनतात.काही ज्येष्ठ .. मोठ्या वयातही नादीष्ट,चळीष्ट.व्यसनी,हलक्या कानाचे ,हेकेखोर,डूक धरणारे,धुमसणारे असतात. शांतता भंग करतात.
ज्येष्ठांनी संयमी राहीले, तरच कनिष्ठ त्यांचा आदर करतील.
तरी.. समाजातील काही ज्येष्ठ वृक्षांसम .. ज्येष्ठत्वाची पायरी चढताना,आपण परिमितता अंगिकारूया..
पुढील पीढीसाठी उत्तम छायादायी ,संस्कार वृक्ष बनुया..
उन्नती गाडगीळ.🌹🙏

Comments
Post a Comment