निग्रह..💐

👩‍🎤निग्रह..नवरात्रात बरेच लोक अनवाणी राहण्याचा नियम करतात.
तेव्हा आठवते एक..ह्रद्य घटना..

अनेक वर्षे झाली ही घटना घडून पण त्याचा चटका अजूनही मम मनावर ताजा आहे..

एक मध्यम वयीन अशिक्षित प्रौढा..
तिचा पती सतत दारुत पूर्ण बुडालेला असायचा. रोज रात्री तिला लाखोली व मारहाण.. नेमच जणू!

तिचा मुलगा जसजसा मोठा होऊ लागला तसतसा.. त्याच्या मनात पित्याबद्दल घृणा व मातेविषयी मात्र अनुकंपा वाढत चालली.मुलगा शिकून नोकरीला लागला.
रोज रोज आईच्या यातना बघत राहीला. कधी कधी वडिलांशी शाब्दिक चकमकी होऊ लागल्या.

पण एक दिवस मात्र भडका उडाला... तरुण रक्त चांगलचं उसळलं.

आईच्या यातना सहन न होऊन ,चवताळून मुलाने पित्यावर हात उगारला.पिता पुत्राची चांगलीच जुंपली!

जन्मदाता कसा.का असेना, आपण त्याच्यावर हात उगारला .. चूक झाली.या भावनेने त्याने आत्महत्या केली.

आणि हे सर्व आपल्यामुळेच झाले, या विचाराने.. त्या मातेने स्वतः ला शिक्षा म्हणून...पादत्राणे वापरणे सोडून दिले.
भरदुपारी बारा वाजता ती स्त्री.. मुद्दाम दोन कि.मी. दूर.. आड रानात.. काट्याकुट्यात असलेल्या मंदिरात अनवाणी जात असे. तिचा हा नेम जन्मभर तिने पाळला.

जीवच पोळला होता, तेथे पाय काय?

स्वतः ला अघोरी शिक्षा करून घेणे.. जन्म भर पाळणे. सोपे नाही.
निग्रह!!!

उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme