घर दोघांचे..

♥घर.. दोघांचे...

एक चौकीदार... खाली मान घालून निमूटपणे काम करत असे.पण.. घरात मात्र शिरजोरी..
स्वामित्व गाजवायचा..

खोपट्यात राह्यचा..
पण आव.. बाजीरावाचा!
पत्नी बिचारी दोन मुलांना संभाळत.. सटर..फटर शिवणकाम करत फाटक्या संसाराला ठिगळे जोडायची!!!

एकदा ती बाळाला भरवत असता..बाळाला ठसका लागला, जीव घाबरा झाला.. बाळाच्या टाळूवर फुंकर घालत पत्नी म्हणाली..

" जरा.. पानी द्या प्यायाला."

तो गुरकावून म्हणाला..
" ते माझं काम नाय !"
ती पण चिडून..

" अवो, बाळाचा जीव घाबरा झालायं..अन् पोर दोघांचे हाय ना  वं?
मग काम माजं एकटीचं कसं व ?"
त्याने दणकन् तिच्या कमरेवर लाथ मारली अन् निघून गेला...

साहेबांच्या घरी गेला..
साहेब.. त्यांच्या छकुलीस मांडीवर घेऊन बाटलीने दूध पाजत होते. ...

ते बघून तो अवाक झाला.
साहेब सहजपणे म्हणाले..

" घर दोघांचे आहे. मूल दोघांचे. हासत..खेळत वाढवायचं!"

संध्याकाळी तो खोपटात गेला. बायको दूर नळावर पाणी आणायला गेली होती. ..
डोईवर घडा.. अन् खाकोटीस.. बाळ !!!
त्याने धावत जाऊन बाळाला कडेवर घेतले.

बायको.. बाळाला पाजत होती..
त्याने शिंकाळ्यातील भाजी निवडायला घेतली.

नवलाईने ती म्हणाली..

" अवं.. असं काय करताय?"
तो तिला कवेत घेत म्हणला..

" घर दोघांच हाय !
पोर बी दोघांच हाय!
दोघांनी मिळून कष्टायचं अन् दोघांनी मिळून वाढवायचं!!!"

धन्यवाद💐
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme