आई---बाबा सुद्धा.. ना..💐
👪आई--बाबा सुद्धा न..
*तू ही रे..* सिनेमा बघत होते. मनात खात्री पटते तेव्हा नायक नायिका एकमेकांना अलिंगन देतात..
(प्रेम दृश्य पाहून) त्यांची आठ..नऊ वर्षाची मुलगी एकदम तोंडावर हात ठेवून.. डोळे विस्फारत.. हळूच दरवाजा बंद करते आणि सहज उद्गार काढते
...** *."'शी..बाबा..आजकालचे आईबाबा दरवाजा सुद्धा बंद करत नाहीत !""*
आणि सिनेमा समाप्त होतो...
सिनेमा संपता..संपता.. पालकत्वाला सुजाण करुन सोडतो..
काळ कितीही पुढे चालला, तरीही मुलांना पालकातील नैतिकतेच्या वर्तनाच्या अपेक्षा त्याच आहेत...
***एक पुजारी सांगत होते.. एक 10वर्षाची बालिका विचारत होती..
"'काका , हा गणपती सर्वांना पावतो ना? मग माझ्या आईबाबांचा डिव्होर्स होऊ नये अशी मी प्रार्थना केली तर तो ऐकेल का? रोज रोज.. आईबाबां भांडतात मी कंटाळले..मला दोघेही हवेत हो.""
***सध्या शाळांतून मानसोपचारतज्ज्ञ नेमले जातात. ते मुलांची चर्चा सत्रे घेतात.. तेव्हा 7ते 15वयोगटातील बालकांच्या इवल्या मेंदूत घरातील प्रसंगांचे/मोठ्यांच्या स्वैर प्रेमाचे वा भांडणाचे ..ताणतणावांचे ..प्रदर्शन बालमनावर ठसते.त्याचे पडसाद चर्चा सत्रात उमटतात..
तेव्हा समजते..
बालकांच्या पालकांकडून अनेक अपेक्षा आहेत.. अनेक तक्रारी आहेत..
मुले भावूकतेने एकेक सांगतात.. मांडतात..
तेव्हा ऐकताना मन विषण्ण होते..
अगदी काही निवडक अपेक्षा काही मुलांनी व्यक्त
केल्या/करतात.. त्या खाली देते.. सर्वच नाही देऊ शकत..
*** मुलांना पालकांची व्यसने खटकतात..
*** अतिरिक्त फँशन च्या आहारी जाणारे पालक नाही आवडत..
***पालक शिवीगाळ करतात.. मारहाण करतात. कडाकडा भांडतात..
एखाद्या नात्याविषयी मन कलुषित करतात ते नाही आवडत..
*** शिक्षण, स्पर्धा, तुलना,करिअर.. याबाबत ते त्यांची मते आमच्या वर लादतात ते नाही आवडत...
*** एका 9वीतल्या मुलाने सांगितले.... आई के.जी.पासून विकतचे पदार्थ आणून तो डबा देते किंवा पैसे देते ते नाही आवडत..
पोळीभाजी/उपमा/पोहे/पराठे.. काही तरी द्यावे..
मी डॉ. व्हायला हवे ही आईची अपेक्षा आहे.. मी शेफ होणार.. माझ्या मुलाला स्वतः छान पदार्थ बनवून देणार..
*** पालक सतत आमच्या वर केलेले खर्च ऐकवतात.ते नाही आवडत..
*** घरात सतत ओल्या पार्टया.. मोठ्या आवाजात T.V. .. चैन..
वगैरे..नाही आवडत..
अनेक अपेक्षा/तक्रारी मुले करतात..
पालक जेव्हा मुलांवर अपेक्षांची ओझी टाकतात, तेव्हा त्यांच्या ही काही अपेक्षा.. असतात..
हे जाणून स्वीकारलेले पालकत्व सुजाण कसे होईल .. बालकांची मने फुलवणे..त्यासाठी पालकांनी .. आईबाबांनी मिळून काही बदल घडवून आणणे.. हा संकल्प नववर्षी करूया..
अगदी तान्हे बाळ सुद्धा.. हात उंचावून.. पाय नाचवून.. गोड हसून..* *घे कडेवर** म्हणते.. तेव्हा आपण कपड्यांची इस्त्रीकडे.. बोटातल्या सिगारेट कडे.. किंवा हातातील पेल्याकडे दुर्लक्ष करून.. आधी बाळाला उचलून घेतो..
इवल्या जीवाची इवली अपेक्षा पूर्ण करतो..
मग.. तेच बाळ.. बालक.. वेल.. कळी.. फूल.. झाले की अपेक्षा वाढतच जाणार ना..
आपल्यातील पालकत्व सुद्धा.. जास्त सुजाण, सजग,समजुतदार.. होणे ..
सादाला प्रतिसाद देणे..
आवश्यक आहे..
धन्यवाद🌷
उन्नती गाडगीळ🙏🌹

Comments
Post a Comment