प्रार्थना...
🌷एका सखीच्या मागणी वरून मी पंचभूतांना उद्देशून एक *गर्भवती साठी *प्रार्थना**
तयार केली आहे. ती परत देत आहे..
🌷🌷प्रार्थना🌷🌷
रविराज तुला नमन करीते भावे..
तेज:पूंज बाळ मज व्हावे।
अनिला तू रे..अवखळ, नटखट भारी..
आरोग्याची देई शिदोरी।
जलदेवी गे.. होऊ कशी उतराई?
संजीवन बाळा.. देई।
गिरीराज , तुला साकडे घाली आई..
खंबीर वृत्ती अन् उंची देई।
वृक्षवल्ली या..शांत घनदाट..
मम बाळासि दावी.. वाट।
हसरं चांदणं ..शीतल हे चंद्राचं..
रुप गोजिरं होवो बाळाचं।
निसर्ग देवासी वंदन करते भावे..
शतगुणी बाळ माझे व्हावे।
धन्यवाद🌷
उन्नती गाडगीळ🌹🙏
तयार केली आहे. ती परत देत आहे..
🌷🌷प्रार्थना🌷🌷
रविराज तुला नमन करीते भावे..
तेज:पूंज बाळ मज व्हावे।
अनिला तू रे..अवखळ, नटखट भारी..
आरोग्याची देई शिदोरी।
जलदेवी गे.. होऊ कशी उतराई?
संजीवन बाळा.. देई।
गिरीराज , तुला साकडे घाली आई..
खंबीर वृत्ती अन् उंची देई।
वृक्षवल्ली या..शांत घनदाट..
मम बाळासि दावी.. वाट।
हसरं चांदणं ..शीतल हे चंद्राचं..
रुप गोजिरं होवो बाळाचं।
निसर्ग देवासी वंदन करते भावे..
शतगुणी बाळ माझे व्हावे।
धन्यवाद🌷
उन्नती गाडगीळ🌹🙏
Comments
Post a Comment