परामर्ष..💐
🙋🏼 परामर्ष..
डिसेंबर महिन्यात मेसेंजर मधे अनेक मेसेजेस आले त्यापैकी. काही निवडक मेसेजेसचा मी येथे आवर्जून उल्लेख करते..
**** एका वयोवृद्धाने लिहिले आहे.. वयोवृद्धांची हट्टी, अविवेकी, अविचारी, लालची ,हुकूमशाही वृत्तीच .. वृद्धाश्रमाची वाट दाखवते.. हे तुमच्या लेखातून पटले.आत्मपरीक्षण केले. आणि सतत दोन वर्षे मी माझ्यात बदल केले. मन व घर शांत झाले.. नाते सांधले.ताई.. धन्यवाद.
****एका मुलीने लिहिले आहे.. मँडम तुमच्या लेखामुळे अर्थिक नियोजन, खर्चावर नियंत्रण, स्वावलंबन याचा मी संकल्प केला आहे.. आणि वायफळ खर्च कमी करून, चंगळवादी न बनता..मुलाला डॉ. करणार..
मँडम.. तुमच्या मुळे माझी चिडचिड पण कमी झाली....So sweet of you.😊😀
**** एक मेसेज.. खाली आठ काँलेजिअनस् ची नावे आहेत..
मँडम.. आम्ही सर्वांनी मिळून संकल्प केला आहे... व्यसन मुक्त होणार.. उद्या चे माता .. पिता.. आम्ही.. आरोग्य नाही बिघडू देणार.. आई शप्पथ!!!
आईबाबांच्या जीवावर चैन करायची नाही..फक्त भारतातच आईबाबा मुलांना 25वर्षापर्यंत पोसतात. आणि मुलांना तो हक्क वा टतो.
हे तुमचे शब्द जिव्हारी लागले.आणि पटले.
आणि गेले अठरा दिवस एक पण सिगारेट ओढली नाही.. घुटका/गर्द/चरस आणि मद्य ला स्पर्श नाही केला. खूप खूप बेचैन झाले. पण निग्रह केला.31डिसेंबर रात्री पार्टी व्यसनाविना करणार .. yes. Promise 👍
**** एका पिताश्रीने लिहिले आहे.. ताई, मी खूप खूप चुकलो.येथून पुढे मुलांना, पत्नीला मारहाण नाही करणार..
**** एका युवतीने लिहिले आहे. मँडम.. माझ्या इगोमुळे घटस्फोट झाला... मुले सैरभैर झाली. पण website वरील तुमच्या *तडजोड* कथा मालिकेने व तुमच्या प्रत्यक्ष भेटीने मला सावध केले. आमचे मनोमिलन झाले..
*** एका सखी ने लिहिले आहे.. उन्नती .. अग,खूप खूप आभारी आहे ग. तुझ्या लेखाने तुटलेले नाते जुळले ग..
उगाच कुणी तरी सांगितले.... ही अश्शीच आहे.. तश्शीच आहे.. संबंध ठेवू नका.. वगैरे.. आणि मी पण तिच्या पासून दूर राहिले. पण एकदा संपर्क आला.उत्तमअनुभव आला.आणि ठरवून टाकले .. स्वानुभव महत्त्वाचा.
स्वतः च्या डोळ्याने बघीतले/स्व कानांनी ऐकल्या शिवाय कुणाला बदनाम करायचे नाही/संबंध तोडायचे नाहीत. गाँसिपिंग नाही. स्व अनुभव महत्त्वाचा..आमचे नाते परत जुळले ग.. किती आभार मानू ग..
खूप बदल घडवून आला ग माझ्यात..
वगैरे अनेक प्रतिसाद वाचून जवळजवळ 42वर्षे चाललेल्या लेखनाचे सार्थक झाले . रोजच आपण सर्वच सुह्रुद .. मला अनेक प्रतिसाद देत असता. .
क्वचित प्रसंगी माझ्या स्पष्ट लेखणीने दोन चार जणांचे रोषही ओढवून घेतले आहेत... पण सर्वांगीण विचार करताना, आत्मपरीक्षण करताना त्यांना ही ते पटले आहे..
मित्रहो.. माझ्या आईने व आजीने त्यांच्या एका हळव्या आगतिक क्षणी.. माझ्या हाती लेखणी दिली.... व सांगितले..
"' भवतालाचे निरीक्षण करून बघ. सर्वत्र अन्याय, अत्याचार, खोटे आरोप करुन एखाद्या व्यक्ती ला उद्ध्वस्त करणे. वाळीत टाकणे,आळ घेणे ,संशय पेरणे.. भांडण लावणे,गंमत बघत बसणे,दुसऱ्याच्या जीवावर चैन करणे..स्वतः ची पोळी पिकवणे..अविचारी.. दूष्ट ..स्वार्थी.. सर्वत्र आहेत.
आम्हाला दोघींना जमले नाही त्यावर लेखन करणे... पण उन्नती.. तू लिही..तू एकांकिका लिहितेस.. त्या ऐवजीं लेख लिही.."'
मी खूपच बावचळले.गोंधळले.. पण त्या दोघी विदुषींची प्रबळ इच्छा बघून एक सांगितले..
मी लिहिन.. ताशेरे ओढेन. पण आत्ता नाही.. मी स्वतः स्वच्छ पारदर्शक जीवन जगेन.. आणि मग.. माझ्या सेवानिवृत्ती नंतर लिहिन..
त्यानुसार प्रत्येक क्षेत्रात.... प्रत्येक वयात.. प्रत्येक आश्रमात.. काय खाचखळगे.. धोके आहेत. ते दाखवून सावध करण्याचा मी मनापासून प्रयत्न केला. माझ्या लेखणीमुळे कुणी दुखावले असेल तर क्षमस्व...
मित्रहो..आपल्यात एक अनुबंध तयार झाला आहे, या लेखणीमुळे.. तो चिरस्वरुपी राहो... वर्षाअखेरीस सर्वा..सर्वांना.. मनापासून धन्यवाद देते. व नवीन वर्षाच्या शुभेच्छा..
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments
Post a Comment