तोंड दाबून..

👩‍🎤तोंड दाबून..

मी आणि शैलू अरूणाकडे गेलो होतो.  शैलूने तिच्या वृद्ध सासऱ्यांना वाकून नमस्कार करताच..
सासऱ्यांनी अतिप्रेमाने तिला जवळ ओढून,मिठीत  कुरवाळत राहिले. शैलू अगदी संकोचून गेली..

ते बघताच..मी म्हणाले..

"' काका, मी आपणास येधूनच नमस्कार करते हं!'"

मला कुणी तुसडी/शिष्ट पदव्या दिल्या तरी चालतात.पण पुरुषांने मिठ्या मारणे..कुरवाळणे नाही चालत!!!

अरूणाने नजरेनेच मला ..
**यथार्थ कृती**** अशी पावती दिली.
आम्ही अरुणाच्या घराची सजावट, तिचे भरतकाम वगैरे बघत होतो. ती उपमा करत होती.

तिने एकप्लेट भरून सुमी(मोलकरीण)जवळ देत ..
"'आजोबांना नेऊन दे!'"

सुमी किळसवाणे ..

"'काकू.. तेवढं सोडून काय पण काम करणार.. ते काम नका सांगू.."

सुमीची बडबड..

""हा म्हातारा नाय!चळलेलं कुत्रं हाय !!! दिसली बाई की चाटतो जिभलं!!!""

अरुणा आत येऊन आगतिकतेने...

'" नक्को केलयं ग सासऱ्यांनी..
त्यांच्या लाळघोटेपणाने मोलकरणी टिकत नाहीत...मैत्रिणी फिरकत नाहीत..
माझ्या सासुने जन्म भर सोसलं..आता आम्ही..
माझ्या नातीच्या मैत्रीणींशी सुद्धा ते लगट करतात..

नात तर विचारते..

"'हे असे किती दिवस चालणार.. नाही तर मी होस्टेल वर राहते.""

आम्ही हळूहळू बोलत होतो. ते आजोबा रिकामी प्लेट ठेवत ..

शैलूच्या खांद्यावर थोपटत....
"' असेच येत रहा. तुमच्या मुळे आज उपमा मिळाला!"

अरुणा पुटपुटली..

"'जसे काही रोज उपाशीच असतात...
माझी करडी नजर असते ना..त्यांच्या जवळ मी कुणा स्त्रियांना फिरकू देत नाही ना..म्हणून मला असे हे बदनाम करतात.माझे जीवन संपूर्ण उद्ध्वस्त झाले आहे.. यांच्या या ऐय्याशी.. वृत्तीने..

माझा नवरा म्हणतो...
मी बदली करवून घेतो..आपण दोघे दिल्ली ला जाऊया..

पण.. हौसेने ,कष्टाने घर घेतले.. सजवले.. ते एका म्हाताऱ्या साठी सोडायचे?
खरचं वानप्रस्थाश्रम बरा होता.. असे वाटते ग..

ही .. एका अरुणाची नाही.. तर अनेक घरा..घरातील व्यथा आहे..

वार्धक्यातील विखारी रंगांची उधळण..
नैतिक अध:पतन...
पुढील पीढीची नासवणं...

अशी किती तरी कारणे..
ओठाबाहेर न पडणारी..
असतात . जी..वृद्धाश्रमाची वाट दाखवतात..

खरचं.. खूप खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे..

धन्यवाद.🌷
उन्नती गाडगीळ🙏🌹

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme