मंगलाष्टक.. बटू साठी..

👨🏼‍🔧मंगलाष्टक..

(माझी सखी गीताच्या मागणीनुसार .. बटूसाठी गोड आशीर्वाद सह.. मंगलाष्टके देत आहे..)

🌹मंगलाष्टक🌹
चाल.. (स्वयंवर झाले सीतेचे..)

विरुपाक्षाचे स्मरण करूनी,
वंदू ,...विघ्नहरा..
आरगे लक्ष्मी कुलस्वामिनी, नमुया..विघ्नेश्वरा..
निर्विघ्नपणे कृपादृष्टीसह कार्यसिद्धी ही करा..

*उगवला सोन्याचा दिन खरा..*****।।धृ.।। 4

माघ कृ.तृतीयेचा रविराज नभी उगवला..
कालभैरव न् मंगळवारचा योग की हो साधला।
सहस्त्र रश्मी प्रकाशाचा,तेजोमय तारा....

*** *उगवला सोन्याचा दिन खरा***** 4

अभ्यंग हे स्नान घालते निर्मळ ही सरिता..
औक्षणासह आशीष देती..
देवयानी अन् लता..।
असिम सुखाने ..भरले सारे..दिन आनंदाचा खरा..

*** *उगवला सोन्याचा दिन खरा..****4

वाद्य वृंद हे जुळले सारे..सजली प्राजक्ता..
सुहास्य वदने सज्ज स्वागता..विलास सर्वदा..
सद्गद होऊनी.. बटू .. चिन्मय.. प्रार्थी हो ईश्वरा...

*** *उगवला सोन्याचा दिन खरा..* ***4

गायत्रीचा मंत्र जपुनी..नमावे हो भास्करा..
नव्या युगाचे तंत्र जाणुनी.. आळवी..रे..सुस्वरा..
ज्ञानाची ही दीक्षा मागुनी..उद्धरी रे.. धरा..

***  *उगवला सोन्याचा दिन खरा.. ****4

धन्यवाद🌷
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme