बालिका घट..
🙎🏻बालिका घट (सुरक्षा?)
नेत्राने विनंती केली,
" मँडम, लेक दोन वर्षांची झाली, खूपच धाकधूक वाटते. जरा यावर लिहा ना..'"
दुसऱ्या.. तिसऱ्या वया पासून मेंदूतील लिंबीक सिस्टीम मुळे भावनांचे नियंत्रण होऊ शकते.त्यामुळे लेकीला अवयवांची ओळख करून द्यावी. व ... ' हे ' इंद्रियं अतीव महत्त्वाचे ,म्हणून च त्याची स्वच्छता, नियमितता, आरोग्य व संरक्षण जरुरी. हे सांगावे.
ज्ञान व भान जरुरी..
मुख्य म्हणजे आम्ही तुझे माता.. पिता..
आमच्या शिवाय कुणी मांडीवर घेणे, पापा घेणे, चिमटे काढणे,कपड्याला हात लावणे, आमीष दाखवणे काही केले तर जोरदार विरोध कर. एक ठोसा दे. ढकलून दे. जास्त जवळ कुणाच्या जायचे नाही. शिष्ट म्हणले तरीही चालेल. पण बेटा, तनमन पवित्र राख. "असे शिक्षण देणे आवश्यक.
काही वेळा आप्तच अगदी रक्ताचे नातेवाईक सुद्धा गैर वागतात. व वैर साधतात...
मुलं ..एखाद्या नात्याला नाकारत असेल तर मुलीचे कौतुक करावे.. व ते नाते तोडावे , वत्सलता व वैषयिकता यातील फरक ओळखायला शिकवावे...
झोपेत दात खाणे, बाहेर एकटी जायला घाबरणे, किंचाळणे, थरथर कापणे,तहान.. भूक.. झोप चक्र बिघाड.. असे काही आढळले तर विश्वासात घेऊन भक्कम आधार देणे आवश्यक...
काळ, वेळ व वय यांची सुसंगती म्हणजे संस्कार!!!
जागृत तर करायचे आहे, पण पुरुष जातीची घ्रुणा, दहशत पण नाही वाटावी याची काळजी घ्यावी.
कारण शंभरात एखादा च दुर्योधन असतो.
त्यामुळे सतत तिच्या वर पाळत ठेवणे.. सतत शंका घेणे जरुरी नाही.
झाड पाठीमागे राहूनच हरित पानांना, कळ्यांना ऊन, वारा, धारा इ. शी सामना करायचे बळ देते .
तद्वत संरक्षण करण्यासाठी तिला स्वयंसिद्ध करावे...
बिनधास्त सांगावे...
हे मुली तू अंबा आहेसच पण वेळ प्रसंगी दुर्गा रुप धारण कर...संवादाने
दोन्ही रुपांनी युक्त करुन समर्थ बालिका .. उद्याची समर्थ माता.. तिच्या सह आनंदाने हासत खेळत मैत्र करणे.आणि अंधश्रद्धा नाही पण..बालवयापासूनच थोडी नामस्मरणाची सवय लावणे आवश्यक आहे . जरुर नाही सतत जप करणे . पण ..
अवेळी अकाळी एकटं दुकटं जाताना देवाचे ,मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन ,वाहनाची मनोमन पूजा करुन मग स्वार व्हावे हा संस्कार अगदी बालवयापासूनच करायला हवा...
आणि बाळ एकलं बाहेर जाताना आपण ही त्याच्या बरोबरच हात जोडून प्रार्थना करुया..सुरक्षतिततेची...
आणि मुलीला वाढवताना फक्त आईवडीलांचच नाही, तर.. इतर नातेवाईकांनी महत्प्रयासाने आपल्या नजरा विखारी नाही तर वत्सल ठेवणे आवश्यक आहे. शेजारीपाजारी,सर्वांनीच तिच्याशी लेकीचे नाते जोडणे..तिच्या वर खेळकर पणे लक्ष ठेवणे,परस्पर विश्वास ठेवणे जरूर आहे..
तिलाही घरात, अंगणात, सौसायटीत,गल्लीत तरी सुरक्षित वाटणे हे जरुरी आहे.
यासाठी ..बुभुक्षित,प्रदूषित, नजरांना स्वच्छ करणे आवश्यक आहे..
त्यासाठी सावध रहाणे आवश्यक आहे...
तू मुलगी आहेस..
म्हणून घाबरवून ,खूप बंधने घालून गुदमरून नाही टाकायचे..
पण.. मुलगा.. मुलगी समसमान हे ढोल पिटून अत्यंत स्वैर.. सैल पण नाही सोडायचे..
आणि.. हा समतोल राखण्यासाठी आईवडील/सासुसासरे सर्वांनी रोजच लेकीसूनांचे रक्षण करण्यासाठी आम्हाला शक्ती, द्यावी ही प्रार्थना करूया..
गजर करुया.. जगदंब !!!
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments
Post a Comment