त्याला पण.. ..

👩‍🎤त्याला पण...???

काल माझ्या साक्षर वर्गात दोन कामकरी महिला अक्षरे जोडून शब्द गुंफत होत्या..
लेकाचे नाव लिहीता आले यामुळे आनंदात होत्या..

इतक्यात . मीनाताई दारात उभी दिसली..
मी चमकून
 '"ओहो ..ये ताई,आत ये बसं!" म्हणाले..

आत जाऊन चहाचे आधण ठेवले. व तिला पाणी दिले. माझा हात दाबतच..तिचा दबलेला हुंदका  जोरात फुटला...

घळचळा आश्रू ओघळू लागले..मी माझ्या इवल्या फाटक्या ह्रदयाशी तिला धरले.. पाणी पिऊन
ती सांगू लागली..

"' ताई.. सहा महिने झाले. दु:ख आत  साठवले आहे.. आज ओठावर आणते..

माझी रजी गेली...

एवढेच समद्यांना माहितीये. पण..

माझा जावई हरामखोर ..
रोज दारू पिऊन यायचा.तिला बदडायचा..अन् उपभोगायचा!!!

ती आठ महिन्याची गरोदर होती.. त्या दिवशी तापाने फणफणली होती.. उलट्यांनी हैराण झाली होती. तरीही बदडली आणि उपभोगली हो..
त्यात तिचा गर्भपात झाला... आणि दोन दिवस तडफडत.. तिने जीव गमावला..

ताई.. तिनेच मला रडत रडत सांगितले.

ताई.. मला सांगा..
गळ्यात काळी पोतं असली,तरीही आजारी बाईवर बळजबरी करणे..

***त्याला सुद्धा बलात्कार च म्हणतात ना हो?***

ताई... दोन वर्षापूर्वी तुम्ही मला साक्षर केले. थोडा संगणक पण शिकवला.बँकेत खाते उघडून दिले. मी खूप खूप शिकले..

पण.. मी साक्षर असूनही माझ्या लेकीला..

** *"'रोज रोज बलात्कार करणाऱ्या नवऱ्या जवळ राहू नको. तू एकटी रहा. घट्ट-- मुट्ट हो!!! '"***

हे नाही शिकवलं बघा..
शिकून पण मी अडाणीच राहिले..

ती गदगदत होती..
चहा पत्ती उकळत होती..

पाती.. चहाची असो.. वा..
स्त्री ची असो..
रोज रोज साहते..अत्याचार...बलात्कार..

फक्त आड रानात होत नाहीत.. तर.. झोपडीत.. महालात.. सर्वत्र.. स्त्री मनाविरुद्ध.. होत राहतात.

मन सुन्न होते..

धन्यवाद.🌷
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme