खिचडी...💐

♥ खिचडी.. एक अप्रूप...* बोळकं पसरत..हासणारं ,धावणारं  अवखळ बाळ.. अन् त्याच्या मागे.. चंदामामा दाखवत.. काऊ चिऊची गोष्ट सांगत .. मऊ.. मऊ खिचडी मायेने भरवणारी आई...

शाळेतून.. काँलेजातून.. दमून भागून आल्यावर...
अरबट.. चरबट.. खाणे झाल्यावर..
परीक्षांचे अवघड गड चढताना..
सहल, कँम्प फायर, ट्रेकींग.. सायकलींग.. स्विमिंग.. हुरडा पार्टी..
खेळ.. भांडण तंटा..
कंटाळा.. आळस..
पैशाची चणचण.. तापाची फणफण.. उन्हाची रणरण.. पावसाची रुणुझुण.. अनवाणी वणवण..
ते.. वार्धक्य.. सर्व प्रसंगी सौख्य देते .. साथ देते.. संगतदेते.. रंगत वाढवते ..
ती.. खिचडी!!!

भारताच्या विविधतेतील एकतेचे प्रतिक.. खिचडी!!!

सर्व अन्नघटक.. भाज्या.. फळे.. पाने फुले.. मसाले..
षड्रस.. स्वतःच्या अंतरात सामावते.. पौष्टिक मूल्य, समाधान.. आनंद देते ती खिचडी!!!

अशी ही साधीसुधी.. तर कधी शाही मेजवानी खिचडी बनली आहे..
ग्लोबल..
दिल्लीत.. इंडिया गेटजवळ
800 किलो खिचडी वर साजूक तूपाची फोडणी घालून तिला  ब्रँडेड रुपडे दिले..

साक्षात.. खाद्य संस्कृती चा ब्रँड अँम्बेसेडर.. संजीव कपूर ने !!!

संजीव कपूर.. एक अजब रसायन!!!
युवा दिलोंकी धडकन!!!
गोड गोड खळ्यात सर्वांना गुंतवून.. पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक क्लुप्त्या लढवून..आकर्षण बिंदू.. खाना..खजाना चा महानायक.. सुपरस्टार!!!

त्याच्या सह योग गुरु रामदेव बाबा... यांच्या अध्यक्षतेखाली.. काल खिचडी बनली!!!
गिनीज बुकाचा भरजरी शालू नेसली.. ब्रँडेड बनली!

पण.. एखादी वस्तू ब्रँडेड बनली की खूपच भाव खाते.. सामान्यांचा खिसा कापते...

आता ही सर्वसामान्य खिचडी.. ब्रँडेड शेला पांघरून.जगभर फिरणार..
पंचतारांकित बनणार...
मग.. भारतातील सामान्य जनांसाठी..

ही खिचडी... बिरबलकी खिचडी नाही ना बनणार ???
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme