काळ... काम... वेळ...

🍎काळ..काम.. वेग..

कँरमच्या स्पर्धा .. सारी तयारी झालेली.उत्साही प्रेक्षक ,कुशल परिक्षक सारेच वाट बघत होते..

पण.. स्पर्धक विजयचाच पत्ता  नव्हता..

मी वर्षाला फोन केला..
ती रडव्या स्वरात म्हणाली..." मँडम , काल आँफीसमधेच विजयला खूप गरगरायला लागले,पोटात असह्य वेदना झाल्या.. हाँस्पिटल मधे आहोत आम्ही..
सोनोग्राफी.. अनेक चाचण्या.. या साखळ्यात अडकलो आहोत.. Sorry!

विजय.. उच्च पदस्थ बँक अधिकारी!
पूर्वी फक्त l.Tक्षेत्रात  कामाचे तास, वेळ आणि काळ यांचा मेळ नसे .

पण आता मात्र सर्वच क्षेत्रात..  कामाचे तास फक्त8 तास हे गणित इतिहास जमा झाले.
आता..
किमान 12तास काम अन् 3तास प्रवास !!!
त्यामुळे शरीरातील गरजेनुसार खाणे..पिणे.. विश्रांती.. न  होता.. सोयीस्कर वेळी .. जे मिळेल ते.. खाल्ले जाते.

चौरस.. समतोल ऐवजीं..
निरस.. घातक..बाधक अन्न ढकलले जाते.
पचनशक्ती चा ताल बिघडतो.. तोल ढासळतो!

अनियमिततेने कौटुंबीक जीवन  विस्कळीत होते.
मुले दुरावतात. चिडचिड होते. नैराश्य येते.
व्यसन वाढतात. रोग जन्म घेतात.

खंत ही आहे.. की भारतात ,प्रबळ मनुष्यबळ असून सुद्धा.. काळ.. काम..वेळ.. वेग.. यात सुसंगती नाही.

कामाचे तास वाढले.. त्यामुळे आरोग्य नष्ट होणे..
ही फक्त कौटुंबिक समस्या नाही तर सामाजिक आहे!

नवीन वर्षात..  आपल्याकडे ही
पद कोणतेही असो..
कामाचे तास फक्त आठ तास!!!
असे नियम केले.. तर..प्रत्येक तनामनाचे ताण.. तणाव कमी होतील.
व आरोग्य उत्तम राहील..
कुटुंब सुखी राहील!

मनशांती.. मनशक्ती.. लाभेल.. मुख्य कुटुंब उद्ध्वस्त होण्याचे प्रमाण कमी होईल !!!
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme