ठकास ठक..💐

💃🏾 ठकास..ठक..
विमानात तरुणीचा विनयभंग..

हा विषय सध्या .. तव्यावर आहे... प्रसारमाध्यमांना.. एक च्युइंग गम मिळाले आहे.
पाठीमागच्या सीट वरुन..
पुढे बसलेल्या तरुणीला स्पर्श करणे.. निंद्य वर्तन!!!
पण... ठकास .. ठक होणे गरजेचे.
फटकारुन.. तिरस्काराने बघून.. उपयोग झाला नाही तर..पीन टोचणे.. चिमटे काढणे.. त्याचे पाय खेचणे..स्वत:च्या वहाणेचा वापर करणे..
मागे कुणी अधम ग--धडे असेल तर मुलींनी निधडे पणाने सामना करायलाच हवा!!

प्रत्येक आईने प्रत्येक वेळा..
शांता माता न राहता.. दुर्गा माता बनायलाच हवे!
मुलांना.. मुळाक्षरांबरोबरच स्वसंरक्षणाचे धडे द्यायलाच हवे!!
त्याचबरोबर धारदार शस्त्रे न वापरता..
नजरेत.. वाणीत.. क्रुतीत .. .. जरब असावी..कुणाची हिंमत नाही झाली पाहिजे .. स्पर्श करण्याची!
प्रत्येक वेळी कराटेच शिकले पाहिजेत असे नाही.
दोन बाहु सरसावले की..
चार हात येतात मदतीला!
पत.. संभाळणे जरुरी आहे.. पण.. कुणी पातळी सोडली.. तर..
स्त्रीत्वाचे रक्षण करणे आवश्यक आहे.
स्त्री घाबरट आहे कळले, तर तो जास्त... चेकाळतो!
वेळेवरच इंगा दाखवून..
शिवाय तक्रार दाखल केली... तर.. बातमी..सद्य
स्त्री सबल झाली..
सुरक्षित झाली.. जागृत झाली.. अशी गौरवास्पद बातमी होणे ही आजच्या काळाची गरज आहे.
तरुण.. पुरुष असो वा स्त्री.... स्वसंरक्षणार्थ दक्ष रहा..
... मनाला दुबळे होऊ देऊ नका..
समर्थ व्हावे..संयम न सोडता सुरक्षित रहावे.. 🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme