दुसरी मुलगी💐

🌹दुसरी मुलगी 🌹
आज एका सखीने सांगितले.. दुसरी मुलगीच.. या विषयीच्या तुझ्या भावना.. स्पष्ट .. स्पष्ट लिही...

🌺12 डिसेंबर 1978 या दिवशी दुपारी 12.12 मला दुसरी मुलगी झाली...
गोल गरगरीत.. गोड.. गोड..गुलाबी .. लालसर .. मऊ मखमली जणू लोकरीचा गोळाच ..काळे कुरळे जावळं..अन् काळेभोर चिमणे डोळे.. बघून मी हरखून गेले..
मुळात माझा स्वभाव रडण्याचा नाही..
अन् कुणाच्या जन्माचे दु:ख करण्याचा तर नाहीच नाही...
पण.. नात्यात मात्र..
," दुसरी मुलगीच?"
" अन् ती सुद्धा 12 वाजता?म्हणजे चांगलेच 12वाजणार!"
असे कुजके..नासके सूर उमटले.
पण.. कुजकी.. सडकी नाती.. काटेरी.. विखारी पाती समजून मी दुर्लक्ष करते...

आम्हा उभयतांवर..माझ्या सासऱच्या अर्थिक जबाबदाऱ्या होत्या.म्हणून मानसिक ताण होता. माझ्या दोन्ही लेकींमुळे  नव्हता..

Airport colony सारख्या प्रशस्त जागेत दोघींची सशक्त वाढ झाली. सर्वच बाबतीत दोघी अग्रेसर होत्या.. आहेत.. कमतरता कसलीच नव्हती.

दुसरी मुलगी.. म्हणून भेद कधीच झाला नाही.
दोघींनाही अर्थिक.. शारीरिक.. शैक्षणिक बाजूंनी मजबूत नवरे मिळाले... आणि गोजिरे सशक्त मुलगे झाले...
अर्थात माझ्या दोन्ही मुली सुद्धा सर्वच बाबतीत खणखणीत नाणी आहेत.

आज माझी दुसरी मुलगी .. अमेरिकेत आहे. तिचा पती नोकरी निमित्ताने दूर गावी असतो.. ती एकटी दोन अवखळ मुलांचे संगोपन व घराचे व्यवस्थापन उत्तम करते आहे.
दुसरी मुलगी म्हणून आम्हाला कधीच खंत वाटली नाही.. किंवा बारा वाजले असे कधीच वाटले नाही.
उलट.. आज तिचा वाढदिवस.. तिची दोन्ही मुले.. चिमण्या हाताने एक जण ग्रीटिंग करणार..
अन् दुसरा.. एखादा छान पदार्थ बनवणार..
आम्हाला याहून खुषी अजून काय हवी हो ?
पहिली.. दुसरी असे काही नसते.. संस्कारक्षम स्वयंसिद्ध बनणे महत्त्वाचे.!!!
उन्नती गाडगीळ 🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme