वेणी...💐
🙎🏻काल सकाळी सात वाजता मी जोशी यांच्या घराची बेल वाजवली.. दार सात वर्षाच्या साहिलने उघडले..व म्हणाला..
"आजी, बाबा ताईची वेणी घालतोय ".
मी आश्चर्याने आत जाऊन बघतच राहिले...
त्याचा बाबा.. संदीप म्हणाला...
" काकू, सारिका(पत्नी) सकाळी6-30 ला बाहेर पडते. त्या आधी स्वराला (लेकीला) उठवून ती वेणी घालणे.. रडारडी.. अन् बालमनावर अन्याय नाही का?
मग मी शिकून घेतली.. वेणी घालणे.. मी या 10वर्षी य चिमुची वेणी घालतो व 9वाजता त्या दोघांना बस मधे बसवून मी कचेरीत जातो.
मी कौतुकाने बघत होते..
स्वराचे सारे केस उलटे फिरवून एक बारीक सरळ रेषा.. मग छोटी तिरपी रेषा अन् परत मानेपर्यंत सरळ रेषा साकारत घनदाट कुंतलांचे दोन समान भाग केले. एक भाग मुठीत धरून ,कानावर, कपाळावर केस नाहीत ना..याची खात्री करून एका भागाचे परत तीन भाग करून.. एकात एक पेड गुंफत छान तिपेडी वेणी तयार केली. मधे.. मधे.. वरचा पेड दाबून वेणीला सरळ रुप देणे.. नंतर लाल रिबीन.. मध्यावर धरुन तीन पेडात तिला चपखल गुंफणे.. गाठ मारणे.. नंतर वेणी दुमडून रिबीनीचे सुबक फूल तयार करणे.
तशीच दुसरी वेणी घालणे.
अन् ही सारी कला साधताना, तिच्या हातात एक आरसा देऊन.. तिच्या चेहऱ्यावरील रेषा वाचणे..
एक ही केस न दुखावता ..
संवाद साधत, चुचकारत तो हौसेने ते काम करत होता.
लेकीला आवड आहे लांब केसाची.. ती जपत होता.पित्रुत्वातील वत्सल मात्रुत्व..
अन् पत्नी ला ल सहकार्य..
प्रत्यक्ष बघत होते.
अन् शेवटी.. संदीपने.. जमिनीवर हात फिरवून स्वच्छ ता राखली!
संदीप.. चा अर्थ.. दीप तेवता ठेवून.. प्रकाश देणे.
मी.. स्वराला सांगितले..
" नुसते Thanks Dad !
म्हणू नको. ओणवी होऊन दोन्ही हात जोडून भूमाथ्यावर.. अन् पित्याच्या चरणाशी ठेवून मनोभावे रोज नमस्कार कर .. वेणी घातली म्हणून!!!
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments
Post a Comment