बोन्साय.. कथा...💐
#कथा स्पर्धा..
# बोन्साय.. कौटुंबीक.. सामाजिक.
मी सज्जात उभी राहून ,समोरच्या गच्चीत बघत होते...
" हं.. हापस जोरात! अस्सा.."
" हो थोडा मागे.. घे.. डावीकडे !हं.. बास्स !"
" सोड सैल ! खेच.. खेच ..
जाऊदे अजून उंच!"
वगैरे उद्गार आसमंतात घुमत होते..
दोन पतंग.. नील, धवल,विशाल आकाश पटलावर ..वाऱ्यावर झुलत.. रश्मींना चूंबत.. नाचत ,थरथरत बाचाबाची करत होते.
मी मोहरले.
तेवढ्यात.. फोन रूणझुणला..
रमा आनंदाने...
" उद्या सकाळी लवकर निघायचे हं!
शेतघर.. भेट.."
ठरल्याप्रमाणे ..
गणपती बाप्पा मोरया..
घोषात आम्ही गाडीत बसलो..
काळीभोर डांबरी सडक हिरवीगार किनार लेऊन वळवळत होती..
जगजित सिंगच्या मखमली सूरांवर मने तरंगत होती.
कच् कन् गाडी थांबली..
खाली उतरलो.
उंच उंच भुरे..गहिरे.. हिरवे डोंगर,जणू स्थितप्रज्ञ योगी!
हिरवेगार मळे.. जणू पाचूची खाण!
गगनचुंबी ताड.. माड..
लेकुरवाळ्या .गर्भ. भाराने वाकलेल्या वेली..लपेटलेलं धुकं.. गारठलेले दवबिंदू..
त्यावर नाचणारी सुवर्ण रश्मी.हरित सळसळती पाने . रसरशीत फळे... रंगीत गंधीत फुले.. गुणगुणते भुंगे अन् भिरभिरती फुलपाखरे..
ओलेती स्रुष्टी..
दिपली द्रुष्टी।
रंगीत गाडी.. खिलारी बैलजोडी.. क्रुषीवलाची भल्लरी..
राजस गोधन.. आर्त हंबर..
मोटेची शान.. पाटाचे गान!
सारेच मनोवेधक..
मन झाले निसर्ग चुंबक।
शेत घर.. मोठा महाल !
विशाल हाँल.. सात..आठ खोल्या.
प्रशस्त टेबल.. फुलांची सजावट.. पदार्थांची रेलचेल.. तत्पर सेवा..
आम्ही त्रुप्त.. त्रुप्त!!!
तांबूल तबक घेऊन एक प्रौढ कारुण्य मुर्ती सेवेसी हजर..
तेवढ्यात..
गौर वर्णाची..उफाड्याची एक धसमुसळी तरुणी..
थयथयाट करत आली.
तिने टेबल ढकलले..
खुर्च्या पाडल्या..
आईच्या हातातीलतबक उधळून दिले..
आईला बोचकारले.. केस ओढले.
रंगाचा बेरंग झाला.
आईने दोघींच्या मदतीने तिला खोलीत डांबले. खोली बंद केली.
विडा तोंडात रंगला ,पण आनंद भंगला!
थोडी वामकुक्षी करून,बोन्साय विभाग बघायला पाय पुढे चालत होते..
पण मन.. त्या मायलेकीत.. बंद खोलीत रेगाळत होते.
बोन्साय.. जपानी भाषेत बोन म्हणजे छोटे भांडे !
त्यात निगुतीने ,चिकाटीने,
उर्जेचा वापर करून जोपासलेले .. साय..झाड!!!
2-3फूट उंचीच्या कुंडीत आंबा,लिंबू, पसारा छाटून..उंची कापून.. वाढवलेली.. फळा..फुलांनी लगडलेली.... 40वर्षाचे वडाचे झाड सुद्धा.. इवल्या कुंडीत दामटले होते.. मूक अश्रू ढाळत होते.
सर्व सख्या .. अय्या!कित्ती गोड ना! छान! चित्कारत होत्या...
मला मात्र .. त्या बंद खोलीतील ..
जन्मत:च बुद्धीने पूर्णत: खुंटलेला..अन् शरीराने नको तेवढा फोफावलेला..एक जड जीव..
ती मुलगी.. एक बोन्साय जणू.. दिसत होती!
मी सख्यांना सोडून त्या खोलीत गेले..
त्या करूण मातेजवळ बसले.. माझे भरले नेत्र बघून माता .. टिपे गाळत.. एकेक शब्दरुपी कोळसे उगाळू लागली...
... .... " माझी लेक.. जन्मतःच अशी आहे.जास्त त्रास झाला .. ती वयात आल्यावर!
उफाड्याची.. गौर वर्णाची ! अजून काय लागते वासनांधनांना?
नरपशुंपासून तिला जपणे....लपवणे कठीण झाले.
अन् ती ही सोकावली होती ग! बुद्धी नाही.. पण भावना?
मग.. सूज्ञ पणे डॉ. शी सल्ला मसलत करून कठोर निर्णय घेतला..
तिचे गर्भाशय काढून टाकले.!!!
आई असून असे केले ग..
देव मला कधीच माफ करणार नाही ." कर्तव्य गंगा वाहत होती...
श्री. ज्ञानेशाची ओवी आठवली..
जैसे विजूचे उगवणे,तोचि अस्त ।
(विजू=वीज, बिजली)
बाहेर गोंगाट ...
आंब्याच्या बोन्साय वर मुले धोंडे मारत होती. पाने ओरबाडत होती.
पतंग.. उन्मळून पडला होता..
दूरून तुकोबांचा अभंग कानावर पडत होता...
मी पतंग, तुझ्या हाती धागा..धागा..
धागा आवरा.. पांडुरंगा..
पांडुरंगा..
मनात विचार चालू होते..
धागा.. पतंगाचा कापला की सत्यानाश!!!
धागा..स्त्रीत्वाचा छाटला
काटला.. की..निदान जीव तरला.. बोन्साय !!!
उन्नती गाडगीळ 🌹🙏

Comments
Post a Comment