लक्ष..लक्ष..बालके💐

लक्ष लक्ष बालके या जगती ...
दृष्टि विना .. चाचपडती ।
केवळ काळोख हाच सोबती ...
ना .. ओळखती .. जन्म दाती ।
फूल नाहीं गंधा विना , मूल नाहीं आईविना ...
तद् वत् जन्म नाहीं .. मरणाविना ।
का बरे दहन करावे .. दोन नयनांचे ?
त्या आधीच स्मरण करावे .. दृष्टि हीनांचे !
करता .. नेत्रदानाचा विचार ...
होईल एक स्वप्न ... साकार !
गुंफुया नेत्रदात्यांची साखळी ...
खुलवुया नेत्रहीनांची पाकळी।
उन्नती गाडगीळ 🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme