रे..पावसा....💐

तन माझे  लाजरे ...
मन माझे  बुजरे ...
धिटाई देऊन जा ...रे पावसा ..
धिटाई देऊन ... जा ....।

वय माझे कोवळे ...
डोळे माझे  भोळे ...
भले.. बुरे... शिकवुन जा ... रे..पावसा..
भले बुरे शिकवुन जा... ।

अंतरंग ...सारे ...
षड् रिपुने .. भरे ...
सारे दोष पुसून जा .. रे .. पावसा ...
सारे दोष पुसून जा ... ।

तन बने यंत्र ...
मन बने तंत्र ...
कष्ट शिकवुनी.. जा.. रे.. पावसा ...
कष्ट शिकवुन... जा....।।
उन्नती गाडगीळ 🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme