प्लास्टिक..💐

🎽प्लास्टिक..

प्लॅस्टिक होते नवे..नवे..
सर्वांना वाटे.. हवेच ..हवे।

बाटलीतून दुध बाहेर पडले..
प्लास्टिक पिशवीत जाऊन बसले ।

तेल डब्यातून टप..टप..गळले..
मोहक आवरणात लपून बसले।

Fast Food चा आला जमाना..
प्लास्टिक ने भरला खजाना।

जाहिरातींनी केला सुळसुळाट..
प्लास्टिक ने घातला..थयथयाट।

आकर्षक रंगांची केली भुलावण..
विषारी वायूंची झाली पखरण।

प्रदूषणाची विखारी पसरण..
रोगराईची त्यात लागवण।

प्लास्टिक ने केला प्राण्यांचा घात..
मनुष्य प्राण्यावर केली मात।

अश्या या प्लास्टिकला सारे हटवा..
स्वच्छ.. सुंदर.. भारत.. बनवा।
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme