पहिला नंबर...💐

♥पहिला नंबर..

मागील आठवड्यात, माझ्या एका कथेला पहिला क्रमांक मिळाला.. बक्षीस समारंभास या..असा एक फोन..

व.. एका ..पाककृती स प्रथम बक्षीस मिळाले.. तारीख कळवतो.. दुसरा फोन..

अन्  परवा.. ह्यांच्या एका स्नेह्यांना आम्ही भेटायला गेलो होतो.. त्यांच्या पत्नी चे निधन झाले म्हणून...

ते स्नेही.. पत्नी च्या आठवणी काढत असता..सहजपणे म्हणाले..

" काय सांगू.. मी सर्व बाबतीत सतत पहिला क्रमांक.. बक्षिसे मिळवत होतो.. पण..51वर्षाची साथ एका.फटक्यात सोडून .. वर जाण्यात मात्र पहिला नंबर तिने पटकावला..

मला एकदम धस्स झाले!

माझ्या डोळ्यांसमोर.. सगळी माझी पहिला नंबर मिळवलेली बक्षिसे( कथा, काव्य, नाटके,पाककृती, अंताक्षरी, खेळ ,उत्तम व्यवस्थापन वगैरे ) गरगर फिरायला लागली.

मी कल्पनेनीच थरथरले..
घामाघूम झाले!!!

कोटी कोटी देवांना.. .साधुसंतांना..म्हणाले..

" मी कधीच पहिला नंबर यावा..बक्षीस मिळावे.. अशी इच्छा ठेवून.. नवस..सायास करून.. धरणे धरुन.. लेखन केले नाही.
किंवा पाककृती केली नाही.. सहज... करत गेले.. सहज.. बक्षिसे मिळत गेली..प्रथम क्रमांक मिळत गेला..

पण.. आज मात्र... मी..
प्रथमच..

अगदी मनोभावे दो हस्त जोडून.. नतमस्तक होऊन ,एक साकडं घालते...

"आम्हा.. पती पत्नीत.. तुझ्या घरी येण्यात ..

*माझाच नंबर पहिला राहू दे!*

देवा.. याबाबत.. काही वेडंवाकडं करू नकोस.
हीच विनंती!!!
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme