Paper quelling art - स्फूट लेखन


 


सुरनळी...Quelling art 

झिरमिरत्या धारात.. भिरभिरत्या वाऱ्यात.. रुणुझुणत्या ऊन्हात.. नाजूक रसवेली ( केळी) थरथरत आहे.पक्व पाने, हरित पाने, पोपटी पाने तर लोभसच.. पण..त्याहून लोभस.. राजस.. नुकतीच फुटलेली.. इवली..इवली..सानुली.. कोवळी.. पर्ण सुरनळी.. मोठ्या मोठ्या पानांच्या कुशीत थरथरणारी.. सुरनळी.. झुलणारी.. खुलणारी पर्णोन्नळी (सुरनळी)बघताच मला आठवल्या.. दुर्गाबाई भागवत!!!साक्षात वागेश्वरी.. दुर्गेश्वरी !!!
त्या संशोधनासाठी.. रानावनात भटकंती करत..प्रत्येक पानाफुलाशी..हितगूज.. कुजबुज करत..निसर्गाशी संधान साधून त्यांच्या देहाचे अलगूज झाले होते.. 
एकदा त्यांना कुणीतरी टोपली भर गुलाबाच्या पाकळ्या दिल्या.. लाल मखमली.. गंध पाकळ्या बघून त्या हरखून गेल्या.. काय करावे.. विचार करताना काही सूचले..
त्या कलावतीने.. प्रत्येक पाकळीची सुरनळी करून त्याचे गुच्छ कलाबुतीने.. धाग्याने बांधले.. निवाळी, बकुळी, जाई..जुई, बटन शेवंती ,पानांच्या सुरळ्या मधे मधे घालून.. हजारो पाकळ्यांचा .. सुंदर हार सहा तासाची बैठक मारुन पूर्ण केला.. विठ्ठलाच्या मुर्ती वर तो खुलून दिसला..तो हार वनवासींना अतिशय आवडला..
आज..यंत्र युगात.. कलर झेरॉक्स पेपर पासून ..
Paper quelling art बहरत आहे. पण या सुरनळीतून .. पर्णोन्नळीतून.. कलाकृती तयार करणाऱ्या त्या.. वनमालेला.. दुर्गाबाईंना शतशः नमन करुया..
अन्.. पावसाळ्यात.. अळूच्या केळीच्या, कर्दळीच्या पानांच्या लोभस सुरनळ्यांचे निरीक्षण करण्याचा .. निसर्ग वाचनाचा छंद लावून घेऊया.. छंद जडला की संहार न होता संरक्षण आपसूकच होते..
उन्नती गाडगीळ 

Comments

  1. खूप छान लिहिलं आहे

    ReplyDelete
    Replies
    1. व्रुषाली, सादर आभार.
      उन्नती गाडगीळ

      Delete
  2. वेगळाच दृष्टिकोन, आणि सुंदर शीर्षक

    ReplyDelete
    Replies
    1. मनस्वी ताई, सादर आभार

      Delete
    2. मनस्वी ताई, सादर आभार

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

एक Rhyme