कविता - पाखरु



 पाखरु 

सुबक घरटे , फांदीवर झुले ...
सा सानुले , पाखरु डुले ।
सुवर्ण रंग ... पंख मखमली ...
रश्मि संग ... खुले पाकळी।
हरित पाती ... मोतीयाचे दाणे ...
आनंदे टीपता ... उमटते गाणे ।
उंच भरारी ... नील आकाशी ...
फडफड चितारी .. रेखीव नक्षी ।
उन्नती गाडगीळ 🙏


येई परतुनी ...
तव .. मायदेशी ...
मम.. पाखरा  !
दो .. डोह भरुनी ...
उभे .. दाराशी ...
येई ... रे.. कोटरा !
उन्नती गाडगीळ 🙏

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme