रानमेवा...




 रानमेवा...
रानात हिरव्या या रे सारे सारे..
पटपट वेचाया टपोरी बोरे।

लाल..लाल तिखट, पांढरे शुभ्र मीठ..
हिरव्यागार कैरीला लावा नीट।

हिरव्या.. पिवळ्या धमक, पेरूची फोड..
 सख्या.. सोबतीची हवी जोड ।

सोनसळी काकडी, आहे जरा वाकडी..
कच् कन् खाऊया, हवी तेवढी।

टपोरी जांभळे.. काळी काळीभोर..
आनंदे नाचती, बाल व थोर।

करवंदांचा द्रोण द्या बरं इकडे..
चिंचेचा आकडा वाट बघे तिकडे।

शतगुणी आवळा पाचक खरा..

चघळत राहुया, आरोग्यास बरा ।

रंगतदार रानमेवा आहे मस्त मस्त..
हासत .. खेळत करू सारा फस्त।
उन्नती गाडगीळ🙏🌹

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme