# मिशन - ए .किचन.
नकळत मनपाखरु बाल्याच्या फांदीवर जाऊन बसले.. व स्मरण दाणे टिपू लागले...
मी 5 वर्षाची असताना.. माझ्या पाठीवर तीन भावंडे सख्खी व दोन चुलत भाऊ .. त्यामुळे ..मी
खूपच मोठी ताई सर्वांची ,म्हणजे पडेल त्य
कामाची।
असे समीकरण झाले होते..त्यामुळे अगदी.. धावता रस्ता क्राँस करून दूध आणणे.. सामान आणणे.. खालून.. तांब्या.. मग कळशी भर पाणी आणणे.. करता करता.. ८व्या वर्षी पासून.. मोठा पितळी कुकर लावणे.. पाट्यावर चटणी वाटणे.. भाजी.. निगुतीने निवडणे.. मायेने मन लावून करणे.. सारे सारे आईने शिकवले.
मी 10वर्षाची होते.. माझ्या भावाला अपघात झाला.. आई.. त्याच्यासमवेत 15 दिवस सोलापूर ला.. आम्ही पुण्यात.. माझी आजी नोकरी करायची.. त्यामुळे ती रात्री झोपायला येऊन सकाळी.. पोळी.. भाजी करुन जायची.. बाकी सारे माझ्या वरच .. माझी बहीण अवघी ५ वर्षाची.. तिच्या साठी मी शिकरण केली.. माझा हात कांद्याचा होता, म्हणून माझ्या भावाने केळी कापून दिली मी त्यात दूध... साखर घालून तिला दिली! तिने नक्कोय.. करत वाटी दूर सारली.. मग मी हात धुवून तिला पोळी कुसकरून दूध साखर घालून दिली.. तिने आनंदाने खाल्ली..
तेव्हा कळले.. शिकरणीत केळे कुसकरून.. हाताची माया.. ऊब.. पण एकजीव होते!!!
माझे 19व्या वर्षी लग्न झाले.. सारीच जबाबदारी !!पण अडले काहीच नाही कारण आईने मुदपाकखान्यात मला तयार केले होते..
लग्नाला जेमतेम 6 महिने झाले होते.. माझे वडील दोन दिवस आले होते..
मी खीर .. पुलाव.. मसाला पराठे केले होते.. ते एकदम खूष! अचानक म्हणाले..
"उद्या first class पुरणपोळी कर !
माझा नवा संसार.. काडीकाडीने जोडणे चालू होते.. मग मी पुरण पाट्यावर वाटले.. घाटले..
पुरणपोळ्या केल्या.. पण खूपच दमल्याने.. जरा जाडसर झाल्या.. माझे मन मला खात राहिले..
पण.. आईचे पत्र आले...
उन्नती , तू लहान आहेस.. घरात यंत्र नाही.. त्यातून तुझी नाजूक अवस्था.. हे सारे त्यांच्या लक्षात यायला हवे होते. असो. तू केल्यास हेच खूप. आता मात्र जपून रहा.. वगैरे..
मायेचं नात असं असत! लहान समजून पदरात घेत !
मग मी आई पदावर आल्यावर तर किचन.. मिशन.. पँशन.. फँशन.. सारे च झाले! अगदी ब्रेड.. केक.. पुडींग.. पिझ्झा.. बर्गर.. अनेक प्रकारचे मसाले.. लोणची .. चटण्या .सुरु झाले.. अद्ययावत साधने वापरुन दर्जा राखून उर्जा दायी पदार्थ.. लेखन .. T.V वर. मासिके.. व्रुत
तपत्रे.. यात सादरीकरण..
अनेक बक्षिसे मिळवली..
विशेष म्हणजे आई आजारी असता.. तिच्या साठी.. 8धान्याची धुवुन , भाजून पावडर करून ठेवली होती..
त्याची पौष्टिक खीर रोज तिला देत होते.. डाँ. नी संमत करून त्यांच्या हाँस्पिटल मध्ये रुग्णांना ते रोज देतात.. विद्याम्रुत.. या नावाने..
आता.. वयोमानानुसार..
किचन.. रेशन.. सुरु..
कमी तेल... तूप.. साखर वापरून.. मायक्रो फूड .. चालू.. योग साथत.. प्रयोग करणे.. हेच मिशन !
उन्नती गाडगीळ🙏🌹

Comments
Post a Comment