वीळी
वीळी
"अय्या, काकू.. खाली बसून चिरताय.. मी तर 2-3 वर्षात खाली बसलेच नाही.. अक्षदा.. अवघी..पंचवीशीची..
आजकाल 20 ते 40 वयोगटात.. गुडघे दुखीचे रुग्ण खूपच आढळतात.
अतीव चिंताजनक !!!इती.मी.
हे ऐकून ती म्हणाली.
" काकू, वेळच मिळत नाही."
मी म्हणाले..
" ठरवून टाक.. स्नान, पूजा, पोथी, भाजी चिरणे वगैरे.. सुखासनात.. मांडी घालूनच करायचे. दिवसात 5-6 वेळा तरी हे सहजासन करायचेच अन्यथा.. गुडघे। ताठरतील.!
मला एकदम माझ्या वडिलांची मुर्ती आठवली..
ते.. काँटवर.. सोफ्यावर.. खुर्चीवर.. मस्त मांडी घालून बसत असत !
ते ७८ -७९वयात सुद्धा त्यांचे कधी पाय दुखले नाहीत.. वा , कधीही पोट सुटलं नाही.. नकळत.. सुखी आरोग्याचा.. सुखासनाचा मंत्र देऊन गेले !!!
आज.. दिंडी त.. तरुण.. मांडा ठोकून भजन गात आहेत.. ही सुखासनात सतत बसण्याचा संस्कार..
सतत अंगीकारुन.. गुडघे दुखीला राम.. राम.. ठोकुया !!!
उन्नती गाडगीळ🙏🌹

Comments
Post a Comment