माझे जावई..गप्पांच्या ओघात म्हणाले ,
" भारतात सर्व चिमुकल्या हातात सतत मोबाईल..
अमेरिका.. देश मोठा.. लोकसंख्या कमी, म्हणून निर्जीव गँझेट्स् चा वापर.. संवाद साधण्यासाठी होतो.
पण अजूनही तेथे मुले जरुरी पुरताच w.a.चा वापर करतात. "

खरच.. विचार करायला लाणारे शब्द !!!

आपण नोकरीच्या स्थानी.. अर्थ नियोजन, करुन कंपनी चा फायदा बघतो..
पण.. घरात मात्र जे मुले मागतील.. जे दुसऱ्या कडे आहे.. ते ते सारे पुरवत राहतो..
मोबाईल,हाँटेलिंग,  करमणूक इ. चा एका सामान्य घरातील एका मुलाचा खर्च किमान 1000₹ महिना आहे, असे पालक सांगतात.. व G.S.T. मुळे चैनीच्या वस्तू महाग होणार म्हणून खंतावतात ...

आपण  अमेरिकेन मुलांसम.. चैनीच्या वस्तूंवर संयम ठेवला.. स्वयंसेवी.. स्वावलंबी स्वतः ला व मुलांना बनवले तर ...

सतत हाँटेलचे व्यसन.. न लावता.. चल, आपण सारे मिळून बनवु.. मोबाईल पँक वर संयम.. ठेवणे, स्कूल बस ऐवजी साइकल देणे.. वगैरे काट छाट मुलांबरोबर चर्चा करून..
काळ.. काम.. वेग.. वेळेचे नियोजन केले तर..भ्रष्टाचाराला आळा बसेल.
G.S.T. मुळे एक प्रगल्भता, जागृतता, परिपक्वता.. आपल्यात येईल. संयम.. समाधान हा संस्कार केल्यास..
गरजा कमी होतील.. अर्थ नियोजनामुळे समंजस पणा वाढतो ..
केवळ आम्हाला नाही मिळाले, म्हणून वारेमाप मुलांवर उधळण केली..
तर.. मुले तर बिघडतातच..अन् देशात भ्रष्टाचार माजतो.
प्रत्येक घरा..घरातील अर्थ नियोजनावर.. देशाची उद्योजिकता.. अर्थ व्यवस्था अवलंबून असते.
तरी .. थोडे जपून.. विचार करून.. खर्च करण्याचा संस्कार अंगीकारुया..
उन्नती गाडगीळ 🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme