पर्यावरण - निसर्ग
४
एक.. बालगीत...
३
अवस्था
एक.. बालगीत...
तेल नाही.. वात नाही..
वायर नाही.. बटन नाही।
तरीही.. आकाशी अविरत...
दीप लावतो तरी कोण ?
नळ नाही.. नळी नाही..
सागर नाही.. तळी नाही..
तरीही.. नभातून पाऊस..
पाडतो तरी कोण ?
कागद नाही.. कलम नाही..ब्रश नाही.. रंग नाही..
तरीही.. हरित कैरीत..
रस..रंग.. गंध.. घालतो तरी कोण ???
३
अवस्था
तप्त सूर्य देवाने केली आहे...
प्रखर उष्णतेची व्यवस्था ...
तन जळते ,पण भाकरी भाजली जात नाहीं!
डोळ्यांनी केली आहे अविरत अश्रूंची व्यवस्था ...
मन मोकळे होते ...
पण तहान भागत नाहीं !
अशी सध्या अवस्था !!!
_______________________________________________
२
सूर्य.. सागर.., वारा.. संवाद.
सागर : हे सूर्य देवा , मी उसळत्तोय ! उफाळतोय ! पण माझ्या अंतरात कच-याचा मळा । तेथे पोचेना तुझ्या ज्वाळा !!! कश्या बनणार वाफा ? कसे बनणार मेघ ? मज काही कळेना !
वारा : मी वाहतो दशदिशा ... खुलवतो आशा! पण जलाशयातील कचरा ... कसा करु निचरा ... मला मार्ग सापडेना ... मेघ कसे बनवावे उमजेना !!
सूर्य : आपणात फक्त शक्ति ! नाहीं प्रदूषण मुक्त युक्ति !
सागर : मी उफाळून ...
वारा : मी घोंघावुन ....
सांगतो मानवा ...
स्वच्छ करा धरा ...
मगच मेघाला आळवा ssss
_____________________________________________________
१
पर्यावरण
आई ... आईं ... बघ ना... ..
आकाश रडत आहे ।
नाहीं नाहीं बाळा ...
पाऊस पडत आहे ।
आई ... आई ... बघ ना ...
फूल नाचत आहे ...।
नाहीं नाहीं बाळा ...
वारा वहात आहे ।
आई ... आई बघ ना ...
पाणी चमकत आहे ।
नाहीं नाहीं बाळा ...
ऊन पडले आहे ।
आई ... आई... सांग ना ...
हे सर्व काय आहे ?
बाळा, हे सारे पर्यावरण !
सारे मिळुन करु रक्षण !!!
उन्नती गाडगीळ 🙏




Comments
Post a Comment