ताई ' गाते अंगाई


( ५ वर्षीय चिमुकली ' ताई ' गाते अंगाई  )... ..

 वर्दी दिली बालचमूला ...
आली *छकुली * माझ्या घरला ।
आनंदे गिरकी घेतली , बाई ...
मी आज झाले ' ताई ',गाते ग अंगाई।।

      मऊ सायीचे गाल ग मखमली ...
      ओठ जणू ग गुलाब पाकळी।
      तुझा हळूच घेता ... पापा ...
      आई ओरडे जाता... जाता ..
परि आबा जवळ मजला घेई....
मी .. ताई ... गाते .. ग.. अंगाई  ।।

    चिमणे डोळे, टुकु टुकु बघती ...
    इवले हात , टाळ्या पीटती ।
    गालगुच्चा .. तुझा ... घेता ...
    डोळे वटारतो ... बाबा ।
परि धाऊनी आजी येई ,कुशीत मज घेई ,
मी तुझी ताई ... गाते .. ग... अंगाई ।।

     लौकर मोठ्ठी हो , जाऊ शाळेला ...
      खाऊ खायला अन् मणि मोजायला ।
      इवल्या नजरेत दिसे धिटाई ...
      नाहीं ऐकलेस तर करेन पिटाई  ।
समजावते तुला ग बाई , गुणवंत .. किर्तीवंत होई ...
मी तुझी मोठ्ठी ताई, गाते ग अंगाई।।

उन्नती गाडगीळ 🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme