ती सध्या काय करते?


ती सध्या काय करते?

आजची तरुणी पुरुषांच्या वरचढ शिकते.. वरचढ कमावते.. वायुवेगे गाड्या उडवते.. एकटी समर्थ पणे राहते.. सारेच कौतुकास्पद!!!

पण विवाहसमयी मात्र तिला.. तिच्याहून उच्च शिक्षीत.. जास्त पगारदार.. जास्त रुबाबदार..  नवराच हवा असतो.. म्हणजे ती स्वत:ला मनातून कमी लेखते का? नसेल तोडीसतोड तर करेन मी तडजोड.. हा आत्मविश्वास तिच्यात नाही का ?

अतीव अपेक्षांनी.. सतत साऱ्यांना नाकारण्याने.. तीचे वय वाढत चालले आहे.. भावनांचा कोंडमारा होतो ,ती स्वैर होत आहे.. अन् तिचे पालक मात्र मनात झुरत आहेत. नैराश्य ग्रस्त  व चिंताग्रस्त आहेत.

अन् पुढे.. तिच्यात व तिच्या अपत्यात .. वयाची, विचारांची, आचारांची खूप मोठी दरी निर्माण होत आहे.. ती नकळत व्यसनाधीन होते आहे.. तनामनाचे आरोग्य बिघडत चालले आहे... अहंभाव वाढत आहे..
संयम.. समाधान.. आनंद हरवत आहे.. कुटुंब संस्थेला भले मोठे खिंडार पडते आहे..

मग प्रश्न पडतो.. ती सध्या काय साधत आहे ???

उन्नती गाडगीळ 🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme