शिरोमणी ' एक काव्य प्रकार..
शिरोमणी ' एक काव्य प्रकार..
एक शब्द अनेक प्रकारे,अनेकार्थी आपण वापरतो.हे लक्षात येते. मराठी भाषा किती सम्रुद्ध आहे, हे ज्ञात होते. अन् या शब्द खेळात मनही रमते..सम्रुद्ध होते..
बघा हं..
ही एकप्रकारे चारोळी.. प्रथम ओळीत तो एकच प्रमुख शब्द ठेवावा. नंतर एक एक शब्द वाढवत जाणे.. उदा.
कागद..
घालतो साद..
लेखणी देई साथ..
अन् भरभरून मिळे दाद ।
कागद..
नोट चलनी..
नाही कुणी धनी..
जो.. धारी.. त्याची राणी ।
कागद..
प्रेम पत्र..
बोभाटा होई सर्वत्र..
दोन जीव करी उद्ध्वस्त ।
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments
Post a Comment