१० वी निकाल



काल इ. 10वी चा निकाल.. गुणांचा वर्षाव वा अवर्षण हा विषय प्रत्येकाच्या तोंडी असणार.. मग.. मला कोण विचारतो , हा सूज्ञ विचार करून  मेघाने एक टिपूस सुद्धा ढाळला नाही !!!☺

उद्या.. इ. 10वी पासांना पहिला वहिला 'शिक्षीत' असल्याचा दाखला मिळणार !!! अन् मग..

अविकसित भागातील पालक.. लै झालं शिक्षनं..

म्हणत.. मुलीचे हात पिवळे करणार.. पाय मागे खेचणार !तसेच.. मुलाला मोलमजुरी.. शेती.. काही बाही करायला लावणार.. पाय मागे खेचणार...

विकसित भागातील पालक.. येन केन प्रकारेण.. पैशाची गाठोडी पाठी घेऊन.. पुढच्या टक्केवारी च्या सागरात मुलांना लोटणार.. अपैक्षांच्या ओझ्याखाली त्याला वाकवणार !!!

इ. 10वीच्या नावाखाली.. टक्केवारी च्या वलयासाठी.. करोडो ₹चा चक्काचूर होतो.. घालमेल होते..

अन् कोवळ्या मनाचा.. ताणतणावाचा .. विचार कुणी च करत नाही.
जर सर्व पालकांनी ठरवले.. इ. 10वी चे स्तोम माजवायचे नाही, मुल.. जसे 8वी तून 9वीत जाते तसेच10वीतून 11वीत जाईल.. तर तो सुवर्ण काळ येऊ शकतो..

निदान दोन वर्षे मुलांच्या मनावर ताण येणार नाही..
निदान 2वर्ष उशिरा मुली बोहल्यावर चढतील..
अन् करोडो ₹ ची उधळण थांबेल..

मुख्य.. बालके ही देशाची संपत्ती.. त्यांच्या तना मनाच्या आरोग्याचा विचार करायलाच हवा..

उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme