पाककृती - बुंदीचे लाडू..
पाककृती - बुंदीचे लाडू
खरं म्हणजे मनीषा, हे लाडू तुझ्या आईनेच मला शिकवलेत.
साहित्य.. 1वाडगा बेसन, दीड वाडगा साखर,काजू, वेलचीपूड, केशर साजूक तूप, रिफाइंड तेल, दूध, लाल व पिवळा रंग.
क्रुती.. साखर बुडेल इतके पाणी घालून.. दोन तारी पाक करणे.पाकात पिवळा रंग व वेलचीपूड घालून ठेवून देणे.
बुंदी.. बेसन चाळून घेणे. त्यात पिवळा रंग, 1चमचा पातळ तूप, व थोडे थोडे दूध घालत.. घालत.. घोळ (बँटर)तयार करणे.
थोडा घोळ बाजूला काढणे, त्यात लाल रंग घालणे.
तेल गरम झाले की गँस बारीक करुन.. स्टिलची किसणी/चाळणी/झारा ..
गरम तेलावर धरून त्यात घोळ पसरणे.. चमच्याने हालवत रहाणे.. खाली तेलात बुंदी पडतात..
बुंदी पडल्यावर गँस मोठा करुन खमंग तळून काढून ठेवणे.
दोन्ही रंगी बुंदी पाडून घेणे.
पाकात बुंदी घालणे.दीड ते दोन तास बुंदी पाकात मुरु देणे. मिश्रणात दोन चमचे साजूक तूप घालून चांगले हालवून.. पाण्याच्या हाताने लाडू वळणे.
पेपर कप मध्ये लाडू ठेवून वर काजू दाबावा.
सूचना.. पाक व बुंदी दोन्ही कोमट असावे.
बुंदी करपट वा कच्च्या तळू नयेत.
मोकळ्या बुंदी.. पेपर कप मध्ये ठेवून काजू कतरी, पिस्ता ने सजवून.. रबडी सह देऊ शकतो.
उन्नती गाडगीळ🙏🌹

Comments
Post a Comment