वट बोलू लागला...


वट..वट..🐤
मी झाडांना पाणी घालत असता, अचानक वटवृक्ष बोलू लागला.. हो..तोच..
भक्कम, चिवट, सदापर्णी, जलचुंबक, औषधी, अक्षय,साक्षात पुराण व्रुक्ष.. माझ्या शी बोलू लागला..
अहो भाग्यम्। माझी न मी राहिले...

स्वत:भोवती गिरकी घेतली.. हळूच चिमटा काढून.. खाराखेरी केली..
खात्री होताच.. दो हस्त जोडून.. एक मस्तक लवून , श्रोता बनले...
तो बोलू लागला..

'" आज तुम्ही ललना , नटूनथटून आलात.. माझ्या विशाल डोलाऱ्या खाली, आनंदाने.. पंचामृती पूजा केली.. धूप दीप उजळले.. थागे.. दोरे बांधून.. जन्मोजन्मी चे नाते द्रुढ केलेत.. पंचखाद्य.. पंचफळे मला अर्पण केलेत, त्याबद्दल मी खूप आभारी आहे.

पण.. आज माझ्या फुलोऱ्यातील पक्षी.. गगन भरारी विसरले.. तेजोनमन विसरले.. किलबिल विसरले.. कलकल करत राहिले.. तुम्ही टाकलेल्या कचऱ्यातून अन्न वेचण्यासाठी भांडत राहिले.. तुम्ही बांघलेल्या.. धागा.. दोरा.. कापूस.. काड्या उचलत .. चोरत.. राहिले..

आकाशात उंच उडणे.. अन्न..  शोधून .. कापूस, काड्या शोधून.. वेचून आणणे.. हेच चलन वलन आहे.. तेच स्वावलंबन आहे , उडणे.. म्हणजे च पंखात बळ निर्माण करणे हेच ते विसरले.. आयते मिळाल्याने.. स्वयंशिस्त.. स्वयंसिद्ध.. स्वाभिमान.. हरवला.. आरोग्याला धोका निर्माण झाला..

तरी हे मानवी प्रदूषण रोज रोज जंगलात नसावे , हीच पारंब्या हालवत.. नतमस्तक होत नम्र विनंती।"

उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme