Great.... Grandpa...!
वीणा व वामन अमेरिकेला गेले होते , मुलगा व सून नोकरी करत ,त्या मुळे ६ महिन्याच्या नातीस खूपच लळा लागला !! एक अनुबंध तयार झाला !
अचचानक सूनेला १५ दिवसांची office tour आली! तेथे कारणे देता येत नाहींत ! Do or die  but work hard !!! भावना गुंडाळूनच काम करावे लागते !
सून वात्सल्याला दूर सारुन , कर्तव्याला सामोरी गेली !
डोळे पुसत दूर गावी गेली !
दुसरेच दिनी बाळाची आजी तापाने फणफणली !
बाबा दिवसभर बाहेर ! मग काय ! बाळाच्या आजोबानी मोठ्या हिमतीने , अतीव कष्टाने नातीचे लालन - पालन केले ! दिवसभर लडीवाळ नात आबांच्या सावलीत व रात्री बाबाच्या कुशीत!!!
आम्ही ऐकूनच थक्क झालो ! वेळ मानवाला वळवते हेच खरे ! बंध सुगंध ठरताल ! नाते घट्ट होते !
Hat's off to Grandpa  !!!
उन्नती गाडगीळ 🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme