सुवर्ण रश्मी रूसली...
सुवर्ण रश्मि रुसली
.. नभात लपली ।
धरेवर येईचना ...
कृष्ण मेघ जाईचना ।।
कणसे तुरे रुसले ...
पाण्यात फसले ...
' मोती ' खुलेचिना ...
रविराज उगवेचिना ।।
वृक्ष ' झुले ' रुसले ...
फुरंगटुन बसले ...
उंच झेप घेईच ना ...
श्रावण सरी येईच ना ।।
मेंदी रुसली ...
कावरी बावरी झाली ..
खुलता .. खुलेचि ना ...
इंद्रधनु .. दिसेचिना ।।
पशुधन रुसले ...
चिखलात रुतले ...
चौखुर उधळेचिना ..
ऋतु वेणु वाजेचिना ।।
दशदिशा रुसल्या ..
काळ्या निळ्या पडल्या ..
प्रीत रंग चढेचिना ..
श्रावण सखा येईचना ।।
उन्नती गाडगीळ 🙏
.. नभात लपली ।
धरेवर येईचना ...
कृष्ण मेघ जाईचना ।।
कणसे तुरे रुसले ...
पाण्यात फसले ...
' मोती ' खुलेचिना ...
रविराज उगवेचिना ।।
वृक्ष ' झुले ' रुसले ...
फुरंगटुन बसले ...
उंच झेप घेईच ना ...
श्रावण सरी येईच ना ।।
मेंदी रुसली ...
कावरी बावरी झाली ..
खुलता .. खुलेचि ना ...
इंद्रधनु .. दिसेचिना ।।
पशुधन रुसले ...
चिखलात रुतले ...
चौखुर उधळेचिना ..
ऋतु वेणु वाजेचिना ।।
दशदिशा रुसल्या ..
काळ्या निळ्या पडल्या ..
प्रीत रंग चढेचिना ..
श्रावण सखा येईचना ।।
उन्नती गाडगीळ 🙏
सुरेख
ReplyDelete